५२१ महाविद्यालयांना दणका

औरंगाबाद आणि मंडळातील बारावी विज्ञान शाखेतील अपात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाबद्दल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने विभागातील ५२१महाविद्यालयांना दणका दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2013, 07:40 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,औरंगाबाद
औरंगाबाद आणि मंडळातील बारावी विज्ञान शाखेतील अपात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाबद्दल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने विभागातील ५२१महाविद्यालयांना दणका दिला आहे.
औरंगाबाद विभागीय मंडळाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या या कनिष्ठ महाविद्यालयांना दंडात्मक कारवाई करीत प्रत्येक विद्यार्थ्यामागे पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी इयत्ता दहावीत विज्ञान विषयात किमान ४० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
मंडळाच्या या नियमाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून मराठवाडा विभागातील अनेक महाविद्यालयांनी तब्बल एक हजार २७२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले होते. दंड न भरल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचे संकेतही नोटिशीमध्ये दिलेले आहेत.