युवासेनेने विद्यापीठाला ठोकलं टाळं...

युवासेनेनं मुंबई विद्यापीठासमोर जोरदार निदर्शने करत विद्यापीठाच्या गेटला टाळं ठोकलं आहे.टी.वाय. बीकॉमच्या अर्थशास्त्र पेपरवरुन न्याय देण्याची मागणी युवासेनेनं केली आहे.

Updated: Mar 29, 2012, 01:35 PM IST

www.24taas.com, मुंबई

युवासेनेनं मुंबई विद्यापीठासमोर जोरदार निदर्शने करत विद्यापीठाच्या गेटला टाळं ठोकलं आहे.टी.वाय. बीकॉमच्या अर्थशास्त्र पेपरवरुन न्याय देण्याची मागणी युवासेनेनं केली आहे.

जुन्या अभ्यासक्रमाऐवजी नव्या अभ्यासक्रमानुसार पेपर घेतल्यानं ९०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडलं आहे. या पेपरच्या गोंधळाप्रमाणे हॉल तिकीटावर केंद्राचा पत्ता दुसरा आणि परिक्षा दुसऱ्याच केद्रांवर असल्याचा प्रकार सुद्धा घडला. याची विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती.

मात्र विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कोणताच निर्णय घेतला नाही म्हणुन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठासमोर आंदोलन केलं. यावेळी हॉल तिकीट आणि पेपर रचनेत गोंधळ घालणाऱ्या अधिकारी आणि उच्चतंत्रशिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी युवासेनेनं केली.