युवासेनेची ‘स्वच्छता मोहीम’

युवासेनेचे मुख्य लक्ष हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, यासाठीच विद्यार्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेतल्याचे दिसून येते, विद्यार्थांना खूश करण्यासाठी युवा सेनेने आगळ्या वेगळ्या प्रकारची स्वच्छता मोहीमच हाती घेतली आहे.

Updated: Oct 21, 2011, 06:20 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

युवासेनेचे मुख्य लक्ष हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, यासाठीच विद्यार्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी  युवासेनेने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थांना खूश करण्यासाठी युवा सेनेने नवीन प्रकारची स्वच्छता मोहीमच हाती घेतली आहे.

 

[caption id="attachment_2999" align="alignleft" width="295" caption="युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे"][/caption]

एखादी शाळा वा महाविद्यालय किमान सोयीसुविधा देत नसेल तर विद्यार्थ्यांनी थेट ०२२- २४३२८१८१ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन युवा सेनेने केले आहे. शाळा-महाविद्यालयांनी वर्ग, कॅण्टीन व प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छतेचे किमान नियम पाळायलाच हवेत. शहर, विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा पुरविणे बंधनकारक असावे अशी युवा सेनेची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात युवा सेनेने काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

 

अभ्यासवर्ग

प्रत्येक वर्गामध्ये एक कचरापेटी ठेवून त्या दररोज साफ करण्यात याव्यात.

वर्गाबाहेरील जागेत कमीत कमी तीन कचरापेट्या ठेवाव्यात, त्यादेखील दररोज स्वच्छ करण्यात याव्यात.

वर्ग व परिसर दररोज पाण्याने स्वच्छ धुऊन पुसण्यात यावा.

 

कॅण्टीन

खाण्याची जागा व किचन हे स्वच्छ असावे. भांडी धुण्यासाठी वेगळी जागा असावी.

कॅण्टीनमधील उपलब्ध असलेले पदार्थ व त्यांचे दर यांची यादी ठळक अक्षरात लिहिलेली असावी.

कॅण्टीनमध्ये पेमेंटसाठी जर स्वतंत्र व्यवस्था असेल तर तेथे बसणार्‍या

व्यक्तीकडे पदार्थ, त्यांच्या किमतीची यादी असावा. त्यामुळे संपर्काचा अभाव न होता वेळही वाचू शकेल.

कॅण्टीनमधील कर्मचारीवर्ग विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण व सहकार्य करणारा असावा.

आवश्यक ठिकाणी कचरापेटी लावून ती दररोज साफ करण्यात यावी.

अन्नपदार्थास स्पर्श करणार्‍या कर्मचार्‍यांनी हातात मोजे व डोक्यात टोपी घालणे आवश्यक आहे.

स्वच्छ पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर बसवून त्याची रोजच्या रोज स्वच्छता करणे आवश्यक आहे.

 

प्रसाधनगृह

प्रसाधनगृहात हात धुण्यासाठी वेगळी जागा असावी व बाजूला टिश्यू पेपर्स असावेत.

आवश्यक ठिकाणी कचरापेटी ठेवण्यात यावी व दररोज स्वच्छ करण्यात यावी.

आवश्यक ठिकाणी दिवे व एक्जॉस्ट फॅन बसविण्यात यावेत.

 

याप्रकारे युवा सेनेने आपल्या नव्या स्वच्छता मोहीमेला सुरवात केली आहे.