मोबाईल बॅटरी बेतली जीवावर

मोबाईलवर खेळने आपल्या जीवावर बेतू शकते. तुम्हाला खरे वाटत नाही ना, मग ही नागपूरची घटना पाहा. काय झालं नक्की, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? नागपूरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानं दहावीतल्या विद्यार्थ्याचा चेहरा भाजला.

Updated: Mar 17, 2012, 09:49 PM IST

www.24taas.com, नागपूर

मोबाईलवर खेळने आपल्या जीवावर बेतू शकते. तुम्हाला खरे वाटत नाही ना, मग ही नागपूरची घटना पाहा. काय झालं नक्की, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना?  नागपूरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानं दहावीतल्या विद्यार्थ्याचा चेहरा भाजला.

डोळ्याखाली गंभीर इजा झाल्यानं सचिन वर्मा या विद्यार्थ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मोबाईलची बॅटरी चुकीच्या पद्धतीनं चार्ज करत असताना स्फोट झाला. स्फोटामुळे बॅटरीतील रसायन अंगावर उडाल्यानं हा विद्यार्थी भाजला. परिणामी मोबाईल रिचार्ज करतानाही सावधगिरी बाळगण्याचा  सल्ला या क्षेत्रातल्या जाणकारांनी दिला आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना काळजी घेतली नाही तर कसे जीवावर बेतते हे समलजे ना. तसेच अनेक घटना अशाही घडल्या आहेत की, कानात एअर फोन टाकून गाणी ऐकण्याचा नादही जीवावर बेतण्याच्या घटना घडल्या आहेत, तेव्हा तुम्ही काळजी सर्वात उत्तम नाही का?

Tags: