उमेश यादव पडला प्रेमात, पाहा कोणी काढली विकेट

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा साखरपुडा झाला असून तो लवकरच दिल्लीतील फॅशन डिझायनर तानियासोबत विवाहबद्ध होणार आहे.

Updated: Apr 16, 2013, 04:34 PM IST

www.24taas.com, नागपूर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा साखरपुडा झाला असून तो लवकरच दिल्लीतील फॅशन डिझायनर तानियासोबत विवाहबद्ध होणार आहे. सध्या उमेश आयपीएलच्या 6 सत्रात दिल्‍ली डेअरडेविल्‍स संघाकडून खेळत आहे. यापूर्वी क्रिकेटर यूसुफ पठानचे लग्न झाले होते.
नागपूर येथील उमेशच्या रामदासपेठेतील फ्लॅटमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. उमेशसह तानियाच्या कुटुंबीय तसेच मित्र परिवारही सहभागी झाला होता. 26 वर्षीय उमेश आणि 24 वर्षीय तानिया वाधवा याची शुभविवाह आयपीएलचे सामने संपल्यानंतर 29 मे रोजी होणार आहे. उमेश आणि तानिया विवाहाच्या तयारीलाही लागले आहेत.
तानिया आणि त्याची भेट दिल्लीत झाली होती. सुरुवातीला मैत्री आणि त्यांनी मैत्री रुपांतर प्रेमात झाले असल्याचेही उमेश म्हणाला. एक वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघानी लग्न करण्‍याचा निर्णय घेतला. या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांनाही परवानगी दिली.