अजित आगरकरचा क्रिकेटला बायबाय

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाज अजित आगरकर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 17, 2013, 10:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाज अजित आगरकर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी दिली.
आगरकरने २६ कसोटी, १९१ वन डे आणि ४ टी-२0 लढतींत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने ११० प्रथम श्रेणी, ६२ टी-२० लढती खेळल्या आहेत. २०१२-१३ च्या मुंबई रणजी विजेत्या संघाचे नेतृत्व आगरकरने केले होते. १९९६-९७ साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार्या आगरकरने ११० प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९९ विकेट्स घेतल्या आहेत.
अजित आगरकरने सुरुवातीच्या काळात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत आपली छाप पाडली होती. मात्र, त्यानंतर त्याला विकेट घेण्यात अपयश आले. तसेच वनडेत सर्वांत जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याने करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू खेळाडू नाव कमाविले.
२००२ साली लॉर्ड्स कसोटीत त्याने इंग्लडविरुद्ध शतक झळकावले होते. आक्रमकपणा हे त्याचे शस्त्र होते. मात्र, त्याला दुखापतींनी घेरले होते. २००५-०६ मध्ये त्याने वन-डे क्रिकेटमध्ये झंझावात आणला
होता. मात्र, त्यानंतर झालेल्या वर्ल्डकपमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे आगामी बांगलादेश दौर्याततून त्याला वगळण्यात आले. दरम्यान, अजित आगरकरच्या निवृत्तीमुळे यंदाच्या रणजी करंडक स्पध्रेकरिता निवडण्यात आलेल्या मुंबई संघाच्या कर्णधारपदाची माळ अनुभवी गोलंदाज झहीर खान याच्या गळय़ात पडली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.