वन-डे गमावली, धोनीच्या यंगिस्तानची टेस्टसाठी अग्नीपरिक्षा!

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढं भारतीय बॅट्समन पात्रता काय आहे. याचा ट्रेलर साऱ्यांना वन-डे सीरिजमध्ये पहायला मिळाला. आता तर टेस्टमध्ये अग्निपरीक्षाच असणार आहे. आफ्रिकन बॉलर आपल्या पेस ऍटॅक भारतीय टीमला उद्धस्त करण्याचे बेत आखत असणार. यामुळंच धोनी अँड कंपनीला सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 14, 2013, 05:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, डर्बन
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढं भारतीय बॅट्समन पात्रता काय आहे. याचा ट्रेलर साऱ्यांना वन-डे सीरिजमध्ये पहायला मिळाला. आता तर टेस्टमध्ये अग्निपरीक्षाच असणार आहे. आफ्रिकन बॉलर आपल्या पेस ऍटॅक भारतीय टीमला उद्धस्त करण्याचे बेत आखत असणार. यामुळंच धोनी अँड कंपनीला सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.

आता टीम इंडियाचा मुकाबला वेगाशी होणार आहे. त्याच बॉलर्सशी सामना होणार आहे की ज्यांच्याबाबत टीम इंडियाच्या प्लेअर्समध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्याच विकेट्सवर की ज्यावर दक्षिण आफ्रिकन बॉलर्सने जगभरातील टीम्सना कमी स्कोअरमध्ये ऑल आऊट केल आहे.
दक्षिण आफ्रिकन फास्ट बॉलर्सने गेल्या तीन वर्षांमध्ये तीनवेळा प्रतिस्पर्धी टीमला पन्नास रन्समध्ये ऑल आऊट करण्याची किमया केली आहे.
९ नोव्हेंबर २०११मध्ये केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला केवळ ४७ रन्समध्येच ऑल आऊट केलं आहे. यानंतर २ जानेवारी २०१३मध्ये केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडला केवळ ४५ रन्सवरच ऑल आऊट केलं होतं. १ जानेवारी २०१३मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलर्सनं जोहान्सबर्गमध्ये पाकिस्तानला केवळ ४९रन्समध्येच ऑल आऊट केलं.
या आकड्यांवरुनच स्पष्ट होत आहे की, टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा मुकाबला कशाप्रकारच्या बॉलर्सशी होणार आहे. मात्र टीम इंडियासाठी केवळ बॉलर्सचीच समस्या नाहीय तर डेल स्टेन, वर्नन फिलँडर आणि मॉर्ने मॉर्केलसमोर ना सचिन असेल, ना द्रविड असेल ना गंभीर असेल ना की लक्ष्मण... सामना नव्या बॅट्समनला करायचा आहे.
२०११मध्ये जेव्हा टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमवेत टेस्ट सीरिज ड्रॉ केली होती. त्यावेळी महत्त्वाचं योगदान हे सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनं दिलं होतं. मात्र, यावेळी हे चेहरे मैदानावर दिसणार नाहीत. या क्रिकेटपटूंच्या जागी असतील नवे चेहरे...
शिखर धवन ३ टेस्ट २४३ रन्स, चेतेश्वर पुजारा १५ टेस्ट १३१० रन्स, विराट कोहली २० टेस्ट १२३५ रन्स आणि रोहित शर्मा २ टेस्ट २८८ रन्स... या बॅट्समनचा रेकॉर्ड शानदार आहे. मात्र, यातील जवळपास सर्वच प्लेअर्सनं रन्स या भारतीय पिचेसवर केलेल्या आहेत. म्हणूनच आता या खेळाडूंची खरी परीक्षा असणार आहे. स्टेनच्या वेगाशी, मॉर्केलच्या बाऊंसरशी आणि फिलँडरच्या स्विंगशी सामना करत भारतीय बॅट्समनला सिद्ध करावं लागेल की दक्षिण आफ्रिकन बॉलर्सच्या वेगाशी मुकाबला करण्याची हिंमतही त्यांच्यामध्ये आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.