www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विक्रमवीर सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी १४७ चेंडूत २०० धावा ठोकल्या होत्या, हा विक्रम ऐतिहासिक ठरला आहे. सचिनने आजच्या दिवशी २४ फेब्रुवारी २०१० रोजी हा विक्रम केला होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, त्याने केलेल्या विश्वविक्रमांच्या पाऊलखुणा आजही तशाच आहेत.
एकदिवसीय सामन्यात वैयक्तिक २०० धावांचा टप्पा गाठणारा सचिन पहिला फलंदाज ठरला. ग्वालियारचे मैदान या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले होते. सामन्याच्या ४५ व्या षटकात सचिन १९१ धावांवर खेळत होता.
शेवटच्या पाच षटकांमध्ये संपूर्ण ग्वालियार मैदान आणि क्रिकेटरसिकांचे लक्ष सचिनच्या खेळीकडे लागून राहीले होते. सचिनने लगावलेल्या प्रत्येक फटक्यावर संपूर्ण मैदानात सचिन..सचिन..नाद घुमत होता.
अर्थात फलंदाज सचिन असल्याने दबावाखाली फलंदाजी करण्यात अनुभवी जोड सचिनसोबत होतीच आणि सचिनने `ऑफ कट` लगावत आपली २०० वी धाव पूर्ण केली..संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला.
अखेर आपल्या सचिनने एकदिवसीय सामन्यातला नवा विक्रम साकारला याचे भावनिक समाधान सर्वांच्या चेहऱयावर होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.