जाहले तेंडुलकरचे आगमन!

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन सचिन तेंडुलकरनं मुंबई ‘अंडर फोर्टीन’च्या टीममध्ये एन्ट्री मिळवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 10, 2013, 04:59 PM IST

www.24taas.com, मुंबई
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन सचिन तेंडुलकरनं मुंबई ‘अंडर फोर्टीन’च्या टीममध्ये एन्ट्री मिळवलीय. अर्जुन तेंडुलकरची मुंबई ‘अंडर फोर्टीन’ टीममध्ये निवड झालीय. अर्जुनची वेस्ट झोन लीगसाठी मुंबईच्या टीममध्ये निवड करण्यात आलीय.
क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी अजून एक तेंडुलकर सज्ज झालाय. अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या ‘अंडर १४’ टीममध्ये निवड झालीय. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुन क्रिकेटमध्ये अजून एक पायरी पादाक्रांत केलीय. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन कपमधील कामगिरीच्या जोरावर अर्जुनची मुंबई टीममध्ये निवड झालीय. डावखुऱ्या अर्जुननं या स्पर्धेत हाफ सेंच्युरी लगावत आपली छाप सोडली होती. आता हमदाबादला होणाऱ्या वेस्ट झोन लीगमध्ये अर्जुन मुंबईसाठी खेळणार आहे.

सचिननं अनेक वर्ष क्रिकेटचं मैदान गाजवलं. शालेय क्रिकेटमध्ये त्यानं आपल्या कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. आता ज्युनिअर तेंडुलकर मुंबईकडून खेळताना कशी कामगिरी करता याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.