तिहेरी शतक झळकावू शकलो असतो- धवन

दक्षिण आफ्रिका-ए टीम विरोधात सोमवारी २४८ रन्सची ऐतिहासिक मॅच खेळणाऱ्या भारत-ए टीमचा सलामीवीर बॅट्समन शिखर धवन म्हणतो, “जर ४४व्या ओव्हरमध्ये आऊट झालो नसतो, तर तिहेरी शतक ठोकता आलं असतं”. धवननं वनडे मॅचमध्ये २४८ रन्स ठोकून भारताच्या खात्यात नवा विक्रम नोंदवलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 13, 2013, 06:08 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, प्रिटोरीया
दक्षिण आफ्रिका-ए टीम विरोधात सोमवारी २४८ रन्सची ऐतिहासिक मॅच खेळणाऱ्या भारत-ए टीमचा सलामीवीर बॅट्समन शिखर धवन म्हणतो, “जर ४४व्या ओव्हरमध्ये आऊट झालो नसतो, तर तिहेरी शतक ठोकता आलं असतं”. धवननं वनडे मॅचमध्ये २४८ रन्स ठोकून भारताच्या खात्यात नवा विक्रम नोंदवलाय.
या आधी भारतासाठी सचिन तेंडूलकरनं २०० तर विरेंद्र सेहवागनं २१९ रन्स वन डे मॅचमध्ये बनवून दुहेरी शतक झळकावलंय. मात्र धवननं १५० बॉल्समध्ये २४८ रन्स करत सेहवागचा विक्रम मोडलाय.
मॅचनंतर धवन म्हणाला, “मला या रेकॉर्डबद्दल माहित होतं, मी खूप खूश आहे. मी जेव्हा ४४व्या ओव्हरमध्ये आऊट झालो. तेव्हा माझ्या मनात आलं की, पूर्ण ५० ओव्हर मी खेळू शकलो असतो, तर ३०० रन्सचा आकडा पार करुन शकलो असतो”.
धवननं आपल्या खेळीच ३० चौकार आणि सात षटकार लगावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी पारी खेळण्याचा रेकॉर्ड सेहवागच्या नावानं आहे. मात्र प्रथम श्रेणी मॅचमध्ये सगळ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड काऊंटी क्लबचे क्रिकेटर एडी ब्राऊन यांच्या नावं आहे, ज्यांनी २००२मध्ये ग्लेमॉर्गनच्या विरोधात २६८ रन्स बनवले होते. यानंतर आता शिखर धवनचं नाव या रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय. तिसऱ्या क्रमांकावर ग्रीम पोलॉक आहेत, त्यांनी १९७४मध्ये ईस्टर्न प्रोविन्ससाठी खेळतांना ईस्ट लंडनमध्ये बॉर्डर टीमच्या विरुद्ध २२२ रन्स बनवले होते.
वनडे मॅचमध्ये सचिन आणि सेहवाग यांच्या रेकॉर्डसोबत बरोबरी करण्याबाबत कधी विचार केला होता का? असा प्रश्न धवनला विचारला असता, “माझ्या खेळीपेक्षा सचिन आणि सेहवागची खेळी खूप चांगल्या दर्जाची होती, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावलं. मी जेव्हा २०० रन्सचा आकडा पार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपली तुलना आता या दोन दिग्गज खेळाडूंशी करण्यात येईल. मी कधीच असा विचार केला नव्हता”, असं धवन म्हणाला.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय वनडे आणि प्रथन श्रेणीच्या क्रिकेटमध्ये आतापर्य़ंत १२ खेळाडूंनी २०० रन्सचा टप्पा पार केलाय. यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त दोन दुहेरी शतक लागले आहेत आणि ते ही भारतीय बॅट्समन सचिन आणि सेहवागनं लगावलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.