सुरु होणार धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट!

महेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 4, 2013, 03:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियानं २०१३च्या वन-डे सीझनमध्ये आतापर्यंत असामान्य कामगिरी केली. आता सीझनमध्ये ६ सीरिज जिंकून आत्मविश्वास वाढलेली धोनीची टीम आफ्रिकन सफारीसाठी सज्ज झाली आहे. वेगवान खेळपट्ट्यांवर धोनीच्या यंगिस्तानची वनडेत टेस्ट लागणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवननं खोऱ्यानं रन्स केले आहेत. त्यामुळंच या तिघांवर पुन्हा एकदा भारताच्या बॅटिंगची भिस्त असेल. मात्र, आफ्रिकेच्या विकेटवर त्यांच्यासमोर चमकदार कामगिरीचं आव्हान असणार आहे.

रोहित शर्मा आणि शिखर धवनवर आपल्या टीमला दमदार ओपनिंग करून देण्याची जबाबदारी असेल. मायदेशात या दोघांची ओपनिंग जोडी चांगलीच चालली. त्यामुळं या मॅचमध्येही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग या तिघांवर आफ्रिकन बॉलर्सचं आव्हान परतवून लावावं लागणार आहे.
आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा आफ्रिकन खेळपट्ट्यांवर आपल्या स्पिनची जादू कितपत दाखवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि शमी अहमदबरोबर तिसरा फास्ट बॉलर कोण असा यक्ष प्रश्न धोनीसमोर असणार आहे.
एबी डिविलियर्सची टीम घरच्या मैदानावर खेळत असल्यानं अॅडव्हानटेज आफ्रिकन टीमलाच असणार आहे. त्यांची टीम अतिशय समतोल वाटतेय. ग्रॅमी स्मिथ, हाशिम आमला आणि जॅक कॅलिस ही त्रिमूर्ती भारतीय टीमसाठी धोकादायक ठरणार आहे. कॅप्टन एबी डिव्हिलियर्स, जेपी डुमिनी यांच्याकडूनही भारताला सावध रहाव लागणार आहे. डेल स्टेन, वेरनॉन फिलँडर आणि मॉर्ने मॉर्केल या वेगवान मा-याचा सामना भारतीय बॅट्समनना करावा लागणार आहे. इम्रान ताहीर हा एकमेव स्पिनर त्यांच्या टीममध्ये आहे.
पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकेला पराभूत करण्याची किमया साधली आहे. त्यामुळं भारतीय टीमचा फॉर्म पाहता धोनीब्रिगेडला डिव्हिलियर्सच्या टीमला पराभूत करण्याची नामी संधी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.