फिक्सिंगमध्ये सध्यातरी इतर खेळाडू नाही - पोलीस संचालक

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी दोन खेळाडू गुंतले असल्याच्या शक्यता दिल्ली पोलीस संचालक नीरजकुमार यांनी फेटाळली आहे.

Updated: May 18, 2013, 01:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी दोन खेळाडू गुंतले असल्याच्या शक्यता दिल्ली पोलीस संचालक नीरजकुमार यांनी फेटाळली आहे. दिल्ली पोलीसांच्या तपासात केवळ 3 खेळाडूंचे नावं समोर आल्याचं त्यांनी सांगितलंय... `झी मीडिया`ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.
स्पॉट फिक्सिंगमध्ये तीन खेळाडू अडकल्यानंतर आणखी काही खेळाडू यात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आणखी कोणते खेळाडू यामध्ये आहेत का? याचाही तपास पोलीस करीत आहेत. मात्र सध्या तरी या फिक्सिंग प्रकरणात तीन खेळाडू आढळून आले आहेत.
स्पॉट फिक्सिंगसाठी श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत ७ बुकींनाही अटक करण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.