सुरेश रैनाचा केला वेगळा विक्रम

चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या सहाच्या सहा सीजनमध्ये ४०० धावा करण्याचा अनोखा विक्रम केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 10, 2013, 02:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या सहाच्या सहा सीजनमध्ये ४०० धावा करण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर नोंदवणार्या् रैनाने बुधवारी सनराइजर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ९९ धावांची खेळी करताना आयपीएल ६ मधील ४०० धावांचा पल्ला पार केला. त्याचबरोबर आयपीएलच्या सर्वच्या सर्व सहा पर्वात असा अनोखा विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदवला.
रैनाने या स्पर्धेत आतापर्यंत आयपीएलच्या सहा पर्वातील ९४ सामन्यांत ३५.६८ च्या सरासरीने २७१२ धावा ठोकल्या आहेत. त्यात एक शतक आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने या हंगामात एक शतक आणि ९९ अशा दोन मोठय़ा खेळ्या केल्या आहेत.
उत्तर प्रदेशचा डावखुरा फलंदाज रैनाने २००८ मधील आयपीएलच्या पहिल्या पर्वात १६ सामन्यांत ३ अर्धशतकांसह ४२१ धावा केल्या होत्या. २००९ मधील दुसर्या् पर्वात १४ लढतीत २ अर्धशतक व ४३४ धावा फटकावल्या होत्या. रैनाने आयपीएल मधील सर्वोत्तम कामगिरी ही २०१० मध्ये आयपीएलच्या तिसर्या१ पर्वात केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.