आयपीएलमध्ये मॅक्सवेल, मिलर वादळाचा तडाखा

शारजात रविवारी ग्लेन मॅक्‍सवेल नावाचे तुफान राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर जाऊन थडकलं, मॅक्सवेलला बाद कऱण्यात राजस्थानला यश आलं.

Updated: Apr 21, 2014, 03:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शारजा
शारजात रविवारी ग्लेन मॅक्‍सवेल नावाचे तुफान राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर जाऊन थडकलं, मॅक्सवेलला बाद कऱण्यात राजस्थानला यश आलं.
मात्र डेव्हिड मिलर नावाचं आणखी एक वादळ समोर उभं ठाकल्याने, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचे आणखी हाल झाले
पंजाबने आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध 7 विकेट आणि 8 चेंडू राखून सलग दुसरा विजय मिळविला. संजू सॅमसन आणि शेन वॅटसनच्या आक्रमक अर्धशतकांमुळे राजस्थानने जवळपास 5 बाद 191 अशी चांगलीच आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपली अविस्मरणीय खेळी जणू मॅक्‍सवेलने सुरू केली, पण त्याला पुरेशी साथ लाभली नाही. त्याने 197 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा केल्यानंतरही आवश्‍यक धावगती अकराच्या आसापास होती.
मॅक्‍सवेल व पुजाराने 67 चेंडूत 116 धावांची भागीदारी केली. त्यात मॅक्‍सवेलचा वाटा 45 चेंडूतील 89 धावांचा होता. पुजाराने एक बाजू लावून धरल्यावर धवलच्या षटकात मिलरने टाकलेला टॉप गियर पंजाबला विजय मिळवून देणारा ठरला.
मिलरने धवल कुलकर्णीने टाकलेल्या 18 व्या षटकात चार षटकारांसह 27 धावा वसूल केल्या आणि चित्र पालटले. मिलर व पुजाराने 29 चेंडूत 67 धावा जोडल्या.
संजू सॅमसन आणि शेन वॅटसनच्या आक्रमक अर्धशतकामुळे राजस्थानने जवळपास द्विशतकी मजल मारली. एकोणीस वर्षीय सॅमसन आणि कर्णधार वॉटसनने अवघ्या सात षटकांत 74 धावांचा तडाखा दिला. अजिंक्‍य रहाणे आणि अभिषेक नायर या मुंबईकरांनी आक्रमक सुरवात करून दिली.
रहाणे हा नायरच्या चुकीच्या "कॉल`मुळे धावचीत झाला. तरीही राजस्थानने 6 षटकांत 54 धावा तडकवल्या होत्या. वॅटसन व सॅमसन परतल्यानंतर स्मिथ आणि स्टुअर्ट बिन्नीने धावगती कमी होऊ दिली नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.