राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही- श्रीनिवासन

श्रीनिवासन यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीबाबत विचारले असता उडवून लावलं. राष्ट्रवादी काँग्रेस बीसीसीआयचा सदस्य नाही. त्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 26, 2013, 05:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
श्रीनिवासन यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीबाबत विचारले असता उडवून लावलं. राष्ट्रवादी काँग्रेस बीसीसीआयचा सदस्य नाही. त्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
आयपीएलमधील मॅच फिक्सिंगप्रकरणी अडचणीत आलेल्या श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा राजीनामा देणार नसल्याचा पुनरूच्चार केलाय. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण अखेरपर्यंत पार पाडणार असल्याचं सांगत त्यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावलीय. बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिका-यांनं आपला राजीनामा मागितलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्याचा काळ बीसीसीआयचा अध्य़क्ष आणि सासरा म्हणून कठीण असल्याची कबुली त्यांनी दिलीय. मयप्पनच्या नियुक्तीत आपली कोणतीही भूमिका नसून त्याची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलय.
याप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगिंतलंय. त्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. पोलिसांच्या चौकशीतही पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार असल्याचं श्रीनिवासन यांनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.