आझाद मैदानाच्या झोपडपट्टीत उद्याचा `क्रिकेटस्टार`

कठोर परिश्रमाचे फळ हे मिळतंच... मुंबईच्या विजय मर्चंट ट्रॉफी विजेत्या टीमचा सदस्य असलेल्या अदीब उस्मानीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेलं यश हेच सिद्ध करतंय...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 31, 2013, 10:40 AM IST

www.24taas.com, मुंबई
कठोर परिश्रमाचे फळ हे मिळतंच... मुंबईच्या विजय मर्चंट ट्रॉफी विजेत्या टीमचा सदस्य असलेल्या अदीब उस्मानीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेलं यश हेच सिद्ध करतंय...
आई-वडिलांपासून हजारो किलोमीटर दूर टेंटमध्ये राहून अदीबनं क्रिकेटमध्ये मिळवलेलं यश, सर्वांनाच थक्क करणारं आहे. मुंबईला विजय मर्चंट ट्रॉफी जिंकून देण्यात अदीबनं मोलाची भूमिका पार पाडलीय. मुंबई... स्वप्नाचं शहर... देशभरतून अनेक जण इथं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला पोहचतात. अदीब उस्मानी त्यापैंकी एक... अदीबनंही बालपणीच क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मात्र, वडिलांना व्यवसायात प्रचंड नुकसान झाल्यानं अदीबचे आईवडिल उत्तर प्रदेशला परतले. क्रिकेटर होण्याच्या ध्येयानं झपाटलेला अदीब मात्र मुंबईतच थांबला. मात्र, अदीबच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. अखेर कोच नौशाद यांनी अदीबच्या राहण्याची व्यवस्था केली. आझाद मैदानावरच अदीब झोपडीवजा टेंटमध्ये राहून मैदानावर सराव करू लागला.
आझाद मैदानावर टेंटमध्ये राहूनचं मग अदीब आपले क्रिकेटचे धडे गिरवू लागला आणि अखेर त्याच्या प्रयत्नांनाही यश आलं. आई वडिलांपासून दूर आझाद मैदानावर टेंटमध्ये राहून अदीबनं क्रिकेटमध्ये केलेली प्रगती सर्वांनाच थक्क करणारी... केवळ कठोर परिश्रम, ध्येय आणि क्रिकेट वेड यामुळे अदीब या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकला. मुंबईच्या अंडर १६ टीममध्ये त्यानं स्थानं पटकावलंय. मुंबईला विजय मर्चंट ट्रॉफी जिंकून देण्यात त्यानं मोलाची भूमिका पार पाडलीय.

कोच नौशाद यांनी केलेली मदद आणि क्रिकेटसाठी घेतलेले कष्ट यांमुळेच यामुळेच अदीब क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करू शकला. त्याची ही कहाणी आता प्रत्येक युवा खेळाडूसाठी प्रेरणा देणारी ठरतेय.