धोनी निघाला धोकेबाज, फिक्सिंगच्या जाळ्यात

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 3, 2013, 04:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.
ही कंपनी क्रिकेटपटूंच्या प्रोफेशनला लाईफला मॅनेज करते. त्याचबरोबर टीम इंडियाचे सुरेश रैना, रवींद्र जाडेजा, प्रग्यान ओझा आणि आर.पी.सिंग यांचं प्रोफेशनल लाईफ हीच कंपनी मॅनेज करते. हे चारही क्रिकेटपटू धोनीचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे टीम सिलेक्शनच्या वेळी धोनी आपलं मत देतो, त्यावेळी या चार क्रिकेटपटूंचा विचार तो निश्चित करत असणार अशी शंका उपस्थित केली जातेय.
त्यातच धोनी टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा कॅप्टन आहे. त्यामुळे केवळ मर्जीतल्या क्रिकेटपटूंना धोनी संधी देतो का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एकूणच धोनीच्या रिती कंपनीत असलेल्या भागीदारीमुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जातायत.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलीस बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांची मदत घेणार आहेत. जगदाळे दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलची भेट घेतील आणि त्यांना बीसीसीआयची कार्यपद्धती समजवून देण्यात मदत करतील.
रिती स्पोर्टस ही धोनीचा मित्र अरुण पांडे याची कंपनी आहे. सध्या भारतीय संघामध्ये व आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघामध्येही असलेले रवींद्र जडेजा, सुरेश रैना यांनाही कंपनीने करारबद्ध केले आहे. याबरोबर, प्रग्यान ओझा व आर पी सिंग या खेळाडूंनाही कंपनीने करारबद्ध केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीने घेतलेले निर्णय या नव्या वादळामुळे 'स्कॅनर'खाली येणार आहेत. दोन परस्परविरोधी हितसंबंध जपण्याचाच हा प्रकार असल्याचे, माजी खेळाडू व निवड समितीचे सदस्य कीर्ती आझाद यांनी म्हटले आहे.
धोनीच्या व्यावसायिक वर्तुळाशी संबंध असलेल्या खेळाडूंना अधिक फायदा मिळून इतर खेळाडूंवर स्वाभाविकच अन्याय होणार असल्याचे मत माजी खेळाडू मनिंदरसिंग याने व्यक्त केले. धोनी हा क्रिकेटमधील सत्तेच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग असल्याचा आरोप यावेली मेहारा यांनी केला.
तसंच राजस्थान रॉयल्स ही फ्रँचायजी आणि क्रिकेटर यांच्या करारामध्ये बीसीसीआयची नेमकी भूमिका काय होती हे जगदाळेंच्या मदतीने दिल्ली पोलीस समजून घेतील. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सध्या भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघालंय. अनेक मोठे मासे या फिक्सिंगच्या जाळ्यात अडकले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.