ज्युनिअर तेंडुलकरला ‘अंडर-१४’मधून वगळलं!

ज्युनिअर सचिन तेंडुलकर म्हणून ओळखला जाणाऱ्या अर्जुन तेंडुलकर ‘अंडर फोर्टीन’च्या संभाव्य यादीतून वगळण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 9, 2013, 01:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

ज्युनिअर सचिन तेंडुलकर म्हणून ओळखला जाणाऱ्या अर्जुन तेंडुलकर ‘अंडर फोर्टीन’च्या संभाव्य यादीतून वगळण्यात आलंय.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्युनिअर सिलेक्शन कमिटीद्वारे निवडण्यात आलेल्या ‘अंडर – १४’ टीममधल्या संभाव्य ३० खेळाडुंच्या यादीत अर्जुनच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. ज्युनिअर तेंडुलकरला सिलेक्शन ट्रायल आणि अन्य टूर्नामेंटमध्ये खराब कामगिरीच्या कारणावरून टीममधून वगळण्यात आलंय.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, अर्जुन हा गेल्या वर्षीच्या विजेत्या असलेल्या मुंबई अंडर- १४ टीमचा सदस्य होता पण त्याला एकाही टूर्नामेंटमध्य खेळायची संधी मिळाली नव्हती. आता अर्जुन मुंबई-१४ साठी सुरु होणाऱ्या ऑफ सीझन कॅम्पमध्येही सहभाग घेऊ शकणार नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.