स्पॉट फिक्सिंग : ‘क्लीन’ चीटसाठी केला होता अट्टहास!

एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआयमध्ये परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राजकुंद्रा यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 29, 2013, 10:31 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआयमध्ये परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राजकुंद्रा यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. द्विसदस्यीय समितीच्या अहवालात या दोघांविरुद्ध कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. हा अहवाल आता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे सोपविण्यात येईल. २ ऑगस्टला याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
एन. श्रीनिवासन बीसीसीआयमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोलकातामध्ये झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत मयप्पन आणि राज कुंद्रा यांना क्लीन चीट देण्यात आली. या दोघांवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप होते. मात्र, ते सिद्ध होऊ शकले नाहीत. गुरुनाथ मयप्पयन सीईओ असलेल्या इंडिया सिमेंट आणि राज कुंद्रा यांच्या राजस्थान रॉयल्स टीमलाही क्लीन चीट मिळाली आहे. या बैठकीत या संदर्भात कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. २ ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईतून एस. श्रीशांत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना आयपीएलदरम्य़ान अटक करण्यात आल्यानंतर या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा उलगडा झाला होता. आण हळूहळू यामध्ये एकेक बडी नाव समोर आली. अभिनेता विंदू दारासिंगलाही यामध्ये अटक आली. त्यानंच चौकशीदरम्यान गुरुनाथ मयप्पन यांचं नाव घेतलं होतं. मयप्पनला ज्यावेळी अटक झाली त्यावेळी श्रीनिवासन यांचा गेमओव्हर होणार, हे अटळ झालं होतं. चौकशी होईपर्यंत श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचे सारे अधिकार सोडले. याच दरम्यान द्विसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, या चौकशीला पुरावेच मिळाली नाही आणि अखेर श्रीनिवासन यांचाच विजय झाला. मात्र, जर या सगळ्यांना क्लीन चीट द्यायचीच होती तर मग या चौकशी समितीचा फार्स का? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतोय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.