... हे आहे ‘धोनी ब्रिगेडच्या विजयाचं रहस्य!

जगजेत्या भारतीय संघाने क्रिकेटमध्ये अफलातून खेळी करत यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. भारताला मिळलेल्या या यशाच्या वाट्यात महेंद्रसिंग धोनीचा सिंहाचा वाटा आहे.

Updated: Nov 28, 2013, 09:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगजेत्या भारतीय संघाने क्रिकेटमध्ये अफलातून खेळी करत यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. भारताला मिळलेल्या या यशाच्या वाट्यात महेंद्रसिंग धोनीचा सिंहाचा वाटा आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघ विरोधी संघावर तुटून पडतो आणि कोणत्याही परिस्थितीत विजयी होतो. विरोधी संघास विचार पडतो की, धोनी आणि त्यांच्या संघाकडे अशी कोणती गुप्त योजना आहे ज्यामुळे हरायला आलेला डावदेखील ते सहज आपल्या घशात घालतात आणि विरोधी संघाला तोंडावर पडावं लागतं?
सध्या भारतीय संघाकडे धावाची तोफ करणारे खेळाडू आहे. त्यात विरोट कोहलीसारखा मोठी खेळी करणारा विराट खेळाडू आहे आणि दुसरीकडे शिखर धवनसारखा ओपनिंगला येऊन मोठी धावसंख्या उभारणारा बॅटसमनही आहे. ओपनिंगला आलेल्या रोहीत शर्माने जोरदार खेळी केल्यानं भारतीय संघात उत्साही वातावरण आहे.
भारतीय कर्णधार धोनीच्या संघाने काल वेस्ट इंडिज संघाचा पराभव करुन सहाव्यांदा एक दिवशीय क्रिकेट चषक जिंकला आहे. विजयाची ही विक्रमी नोंद थांबायचं नाव घेत नाही. ‘धोनी ब्रिगेड’चा प्रत्येक खेळाडू हा चांगलाच फॉर्मात दिसतोय. सुरुवातीला येऊन शिखर धवनने विक्रमी शतक केले. त्याचबरोबर धवनने २०१३ मध्ये पाच शतक (वन डे) करुन जगातील पहिल्या फलंदाजाचा मान पटकावलाय. धवन हा २०१३ मधला तिसरा (विराट कोहली आणि रोहीत शर्मानंतर) बॅटसमन आहे.
एकदिवसीय सामन्यात भारत अव्वल स्थानावर आहे तर कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. २०१३ या वर्षाची सुरुवात इंग्लंडला ३-२ अशा फरकानं पराभूत करुन झाली होती. त्यानंतर आयसीसी ट्रॉफीही जिंकली. धोनीला दुखापत झाल्यामुळे तो संघात नसता नाही. कोहली कर्णधारपदाची धुरा सांभाळत असताना झिम्बॉम्वेला भारताने ५-० अशा फरकानं हरवलं. तसंच ऑस्ट्रेलियाला ३-२ आणि वेस्ट इंडिजला २-१ ने धूळ चाखली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.