मला `आयटम गर्ल` का म्हणतात?

`छइयां-छइयां`, `मुन्नी बदनाम हुई` आणि `अनारकली डिस्को चली` सारखे सुपर हिट गाणे साकारणारी अभिनेत्री मलायका अरोरा खानला आयटम गर्ल म्हटलेलं आवडत नाही.

Updated: Jan 13, 2014, 11:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`छइयां-छइयां`, `मुन्नी बदनाम हुई` आणि `अनारकली डिस्को चली` सारखे सुपर हिट गाणे साकारणारी अभिनेत्री मलायका अरोरा खानला आयटम गर्ल म्हटलेलं आवडत नाही.
मुंबईतील एका रियलिटी शोच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मलायका अरोरा खान म्हणाली, मी जे गाणे साकारते त्यांना आयटम साँग का म्हटलं जातं. त्याला एक विशेष गाणं, अथवा स्पेशल साँगही म्हणता येईल, एक असं गाणं ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाविषयी उत्सुकता वाढते, अशा गाण्याला आयटम साँग म्हणणे, आक्षेपार्ह तर आहेच, पण तो एक मूर्खपणाही असल्याचं मलायकाने म्हटलं आहे.
आता करिना कपूर, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा सारख्या मुख्य प्रवाहात काम करणाऱ्या अभिनेत्रीही आयटम साँग करतात. याचा मलायका अरोरा यांच्या करिअरवर किती फरक पडलाय, असा प्रश्न मलायकाला विचारण्यात आला, त्यावर मलायकाने उत्तर दिलंय.
उत्तर देतांना मलायका म्हणाली, मला नाही वाटत कोणताही परिणाम होईल किंवा झालाय, कारण बॉलीवूडमध्ये एवढं काम आहे की, इथे प्रत्येकाला स्कोप आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.