‘अमिताभ-रेखा’ एकत्र विमानप्रवास करतात तेव्हा...

मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 8, 2013, 03:46 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई
मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.
बॉलीवूडची एकेकाळची बहुचर्चित आणि प्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. `सिलसिला` या १९८१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शेवटचे एकत्र या दोघांनी काम केलं होतं. त्यानंतर गेली अनेक वर्षे सुपरस्टार अमिताभ आणि रेखा हे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेले नाहीत.
अमिताभ यांच्यासोबत विमानातील पायलटने काढलेल्या छायाचित्रात बिग बींच्या मागच्या सीटवर रेखा बसल्याचं दिसतंय. एका कार्यक्रमावरून परतत असताना प्रवासा दरम्यान या दोघांनीही एकाच विमानातून प्रवास केल्याचं त्यातून दिसतंय.

विमानाच्या पायलटनं हा फोटो एका सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केलाय. या फोटोनं सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर एकच खळबळ उडवून दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.