ज्येष्ठ अभिनेते सुधीर यांचं निधन

70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये व्हिलन, गुंडा म्हणून आपली ओळख ठसवणारे ज्येष्ठ अभिनेते लाला सुधीर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 13, 2014, 10:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये व्हिलन, गुंडा म्हणून आपली ओळख ठसवणारे ज्येष्ठ अभिनेते लाला सुधीर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालंय.
सुधीर हे 70-80च्या दशकात सर्वात जास्त चर्चेत होते. बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत ‘फाईट’ करताना आपण त्यांना पाहिलंय. त्यांनी हास्यअभिनेता म्हणूनही स्वत:ला सिद्ध केलं होतं. त्यांना लिखाणाचीही आवड होती.
2012 साली सुधीर यांना भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. आपल्या करिअरमध्ये दीर्घकाळपर्यंत काम करत राहणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये सुधीर यांच्या नावाचाही उल्लेख होतो.
देव आनंद यांच्यासोबत ‘हरे राम हरे कृष्णा’, अमिताभ यांच्यासोबत ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटांत काम करणाऱ्या सुधीर यांनी ‘बादशाह’ या चित्रपटात शाहरुख खानसोबतही काम केलंय.
सुधीर हे अविवाहीत होते. त्यांच्या जवळच्या मित्रांना त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्यांनी यासंबंधी मीडियाला माहिती दिली. त्यांनी आपला बंगला याआधीच सोडला होता. सुधीर हे सिनेनिर्माता मिलन लुथरिया यांच्या वडिलांचे छोटे भाऊ आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.