बिग बीसोबत काम करणार उषा जाधव

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव, आता अमिताभसोबत भूतनाथ रिटर्न्स चित्रपटात दिसणार आहे. भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट भूतनाथ चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात अमिताभची भूतनाथची ही भूमिका कायम असणार आहे. मात्र इतर सर्व पात्र बदलली आहेत.

Updated: Jan 28, 2014, 07:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव, आता अमिताभसोबत भूतनाथ रिटर्न्स चित्रपटात दिसणार आहे. भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट भूतनाथ चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात अमिताभची भूतनाथची ही भूमिका कायम असणार आहे. मात्र इतर सर्व पात्र बदलली आहेत.
भूतनाथ रिटर्न्समध्ये पार्थ या मुलाचा प्रवेश झाला आहे. या पार्थच्या विधवा आईची भूमिका उषा जाधव साकारणार आहे. यापूर्वी भूतनाथमध्ये बंकी या लहान मुलाभोवती कथा गुंफण्यात आली होती.भूतनाथ रिटर्न्स चित्रपटाचं ऐंशी टक्के चित्रिकरण पूर्ण झालं आहे.
उषा जाधवने यापूर्वी अमिताभसोबत कौन बनेगा करोडपतीची जाहिरात केली होती. यात मुलींचे महत्व पटवून देण्यासाठी ही जाहीरात होती, त्यावेळी उषा जाधवचा चेहरा घरोघरी ओळखीचा झाला होता.
धग चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपली अभिनेत्री म्हणून ओळख झाली असल्याचं उषा जाधवने म्हटलं आहे. उषा जाधवसह बोमन इराणीचीही या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे, रणबीर कपूर याचीही यात पाहुणे कलाकाराची भूमिका आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.