पूनम पांडेंने `नशा`चं शूटींग केलं नशेत...

अभिनेत्री बनण्यासाठी तयारी करत असणारी मॉडेल पूनम पांडे नेहमीच आपल्या वागण्याने वादात राहते. विवाद आणि पूनम हे जणू काही समीकरणच झालं आहे.

Updated: Jan 3, 2013, 12:51 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनेत्री बनण्यासाठी तयारी करत असणारी मॉडेल पूनम पांडे नेहमीच आपल्या वागण्याने वादात राहते. विवाद आणि पूनम हे जणू काही समीकरणच झालं आहे. आता पूनमने नवा कारनामा केला आहे.
मॉडेल पूनम पांडे सध्या नशा या सिनेमाच्या शूटींग मध्ये बरीच व्यस्त आहे. त्यामुळे ती भरपूर चर्चेत आहे. एक रिपोर्टच्या मते, पूनमने नशा सिनेमासाठी एका दृश्यात नशेत असल्याचे दाखवून काही सीन शूट केले आहेत. असं असू शकतं की, ही दिग्दर्शकाची मागणीही असू शकते. पण नशेत धूत होऊन शूटींग करणं ही काही पूनमसाठी वावगी गोष्ट नाही.
एका दैनिकाच्या मते, पूनमचं म्हणणं आहे की, ३१ डिसेंबरला सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. या दिवशी लोक सरत्या वर्षाला निरोप देतात. आणि याच दिवशी दिग्दर्शकाने ह्या सिनेमाच्या पार्टी सीनचं शूट करण्याचं ठरवलं. पूनमनेही म्हंटल आहे की, दिग्दर्शकाच्या मते, वास्तव दाखविण्यासाठी असं दाखवलं गेलं. आणि तसंही पार्टीसाठी दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. या सिनेमात पूनमने बरीच भडक दृष्य दिल्याचेही समजते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x