www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडची देसीगर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिची बहीण परिनिती या दोघी एका नव्या विषयामुळे चर्चेत आल्या आहेत. प्रियांकाचा ‘जंजीर २’ आणि परिनितीचा ‘शुध्द देसी रोमान्स’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. त्यामुळे आता बाँक्स ऑफिसवर या दोन्ही बहिणी एकमेकांना टक्कर देणार यात वाद नाही.
परिनितीचा `शुद्ध देसी रोमान्स` हा चित्रपट १३ सप्टेंबरला रिलीज होणार होता. आता तो ६ सप्टेंबरलाच रिलीज होत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी प्रियांकाचा ‘जंजिर २’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रियांकाला असं मुळीच वाटत नाही की, तिच्या चित्रपटाची टक्कर परिनितीच्या चित्रपटबरोबर व्हावी. मात्र, नियतिच्या मनात काय आहे, हे प्रियांकाला कोण सांगणार?
परिणितीच्या चित्रपटामुळे आपल्या चित्रपटावर कोणताही परिणाम होता कामा नये, असेही प्रियांका सांगते.‘जंजिर २’ हा चित्रपट १९७३मधील अमिताभ बच्चनच्या ‘जंजिर’ या चित्रपटाची डमी असल्याचे समजते. या चित्रपटामध्ये प्रियांकाबरोबर रामचरण तेजा, संजय दत्त, प्रकाश राज आणि माही गील हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तर परिनितीच्या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत आहे. येत्या ६ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर कोणाचा चित्रपट बाजी मारणार आहे? यांची उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.