पारंपरिक दागिन्यांची सर कशालाच नाही!

‘चपलाहार, मोहनमाळ, चंद्रहार आणि नाकातील चापाची नथ हे माझे आवडते दागिने... पण खरं सांगू का, माझ्या सासूबाईंनी मला दिलेल्या पाटल्यांची सर कशालाच नाही हं!’... धक धक गर्ल माधुरी नेन्यांचं कौतुक करत होती.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 5, 2013, 12:00 PM IST

www.24tass.com , झी मीडिया, मुंबई
‘चपलाहार, मोहनमाळ, चंद्रहार आणि नाकातील चापाची नथ हे माझे आवडते दागिने... पण खरं सांगू का, माझ्या सासूबाईंनी मला दिलेल्या पाटल्यांची सर कशालाच नाही हं!’... धक धक गर्ल माधुरी नेन्यांचं कौतुक करत होती. विलेपार्ल्यातील नेहरू रोड इथं पुण्यातले प्रसिद्ध ज्वेलर्स पु. ना. गाडगीळ यांच्या मुंबईतल्या शोरूमचं उद्घाटन माधुरीच्या हस्ते झालं. यावेळी बोलतांना माधुरीनं आपली दागिन्यांमधील आवड बोलून दाखवली.
कार्यक्रमासाठी फिकट गुलाबी रंगाची जरीकाठ पदराची साडी नेसून, गळ्यात हिर्यांेचा नेकलेस असा पेहराव केलेली माधुरी जेव्हा आपल्या मर्सिडीजमधून गाडगीळ पेढीसमोर दाखल झाली एक क्लिक करण्यासाठी चाहत्यांत एवढी रेटारेटी झाली की माधुरीला पंधरा मिनिटं गाडीतच बसून राहावं लागलं.
उद्घाटनानंतर माधुरीला तिच्या आवडत्या दागिन्यांबाबत विचारलं असता, तिनं आपले आवडते दागिने तर सांगितलेच. सोबतच ‘जीवापाड जपलेला दागिना कुठला?’ हे सांगताना माधुरी म्हणाली, ‘मदर्स डे’ला माझ्या मुलांनी मला एक अंगठी भेट दिली. ती अंगठी माझ्यासाठी लाखमोलाची आहे. एकूणच काय तर नेहमी दागिन्यांनी नटलेल्या माधुरीच्या मनात मात्र भरले आहेत पारंपरिक दागिने, हेच तिच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.