जियाच्या पत्रात, बाळाला या जगात येऊ दिले नाही?

अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने धाडसी पाऊल उचलत जियाचे सहा पानी पत्र जगजाहीर केलेय. या पत्राद्वारे जियाच्या मृत्यूला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. जियाने आपल्या प्रेमाचे प्रतिक असणारे बाळ या जगात येऊ दिले नसल्याचे म्हटलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2013, 12:49 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने धाडसी पाऊल उचलत जियाचे सहा पानी पत्र जगजाहीर केलेय. या पत्राद्वारे जियाच्या मृत्यूला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. जियाने आपल्या प्रेमाचे प्रतिक असणारे बाळ या जगात येऊ दिले नसल्याचे म्हटलेय.
जियाच्या पत्रात....गोवा टूर माझ्यासाठी बर्थ डे ट्रीप होती. तुझ्या इतक्या अवहेलनेनंतरही मला तुझी सोबत हवी होती. आपल्या प्रेमाचे प्रतिक आपले बाळसुद्धा मी या जगात येऊ दिले नाही. मात्र यामुळे मला मोठा धक्का बसला होता. मी आतून खूप तुटली होती. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले. त्याजचे फळ मला काय मिळाले.... तुझ्यावर प्रेम करण्याचे फळ म्हणून मला शिव्या, अत्याचार, रेप आणि अवहेलना!
तुझ्यावर केलेल्या प्रेमापोटी मी हे सर्व सहन केले. पण, मला तू काय दिलेस. दूरावा, धोका आणि यातना. जिथे तुझे विश्व‍ पार्टी आणि सुंदर मुलींच्या मिठीपर्यंत मर्यादीत होते, तिथे मला माझ्या कामावर प्रेम होते. माझ्या आयुष्यायत केवळ तूच होतात आणि माझे करिअर. मला तू फसविले त्यामुळे आता मला जगायचे नाही. मी माझ्या दहा वर्षांच्याड करिअरला अलविदा करुन जगाचा निरोप घेत आहे. तू हे सर्व वाचत असशील त्या वेळी मी कदाचित दूर गेलेली असेन. हे शब्द आहेत, आत्महत्येपूर्वी लिहिल्या पत्रात.

जियाच्या आईने पत्र जाहीर करताना म्हटले, ती कोलमडली होती. तरीसुद्धा ती या परिस्थितीचा सामना करत होती. मात्र सूरजने प्रेमात दिलेल्या धोक्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल.
जेव्हा तुला हे पत्र मिळेल, तेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलेली असेन. तुला कदाचित हे ठाऊक नसेल, पण तू माझ्यासाठी सर्वस्व होता. तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता हे मी शब्दांत तुला सांगू शकत नाही. मी तुझ्यात कधी गुंतत गेले, ते माझे मलाच कळले नाही. मात्र तू माझी सतत अवहेलना करत राहिला, असे जिया पत्रात म्हटल्याचे तिच्या आईने स्पष्ट केलं.
माझी खूपच निराशा झाली. प्रत्येक दिवशी उठताना मनात येत की आज मी उठायलाच नको, असं वाटक होतं. ज्याचा अंत नाही अशा चिर निद्रेत झोपायचे आहे मला. मी माझे भविष्य नेहमी तुझ्यासोबत बघत होते. माझं तू सर्वस्व होतास. मात्र आता तुझ्यापासून मला कुठलीही अपेक्षा नाहीये. मी आतून स्वतःला मृत समजत आहे. मी तुला किती भेटवस्तू दिल्या, याचा काहीही अर्थ नाहीये. मी माझे सर्वस्व तुला अर्पण केले होते. तू मला क्षणाक्षणाला मारत गेलास आणि मी मरत गेले. पहिल्याच भेटीत मी तुझ्या प्रेमात पडले.

नशीबाने आपल्याला एकत्र आणले. कदाचित नशीबालाच ते मान्य असावे. तू केवळ मला बलात्कार, अभद्र वागणूक आणि यातना दिल्यास. जिथे तुझे विश्वा पार्टी आणि सुंदर मुलींच्या मिठीपर्यंत मर्यादीत होते, तिथे मला माझ्या कामावर प्रेम होते. मी जर आता थांबले तरीसुद्धा मी केवळ तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करत राहिले असते. मी तुला कधी सांगितले नाही, मात्र तू दिलेला धोका मला फार पूर्वीच कळला होता. तू धोका देणार असल्यासची माहिती देऊन एकाने मला सावध करण्याकचा प्रयत्न केला होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. तू दिलेल्या धोक्यामुळे मी पूर्णपणे कोलमडली आहे. मात्र तरीसुद्धा मी गप्प बसले. तूच मला सांग मी जे केले, ते दुसरी कोणती मुलगी करु शकेल का? मी तुला माझ्या रक्ताने पत्र लिहिले होते.
माझ्याकडे जे काही थोडे पैसे होते, ते मी तुझ्यावर खर्च करत राहिले. त्या मोबदल्यात तू मला प्रेमाचा एक शब्दही दिला नाहीस. आपल्या प्रेमाचे प्रतिक आपले बाळसुद्धा मी या जगात येऊ दिले नाही. मात्र यामुळे मला मोठा धक्का बसला होता. मी आतून खूप तुटली. तुझा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी मी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. तू मात्र माझ्याकडे पाठ फिरवली. तू मला साखरपुड्याचे प्रॉमिस केले होते. मात्र नंतर तू आपल्या शब्द बदलास.
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करत राहिले, पण तू हसत राहिला. मला तुझ्याकडून केवळ प्रेम हवे होते, पण तू हा आनंदही माझ्यापासून हिरावून घेतलास. एवढे सगळे झाल्यानंतर आता माझ्या आयुष्यात काय शिल्लक राहिलेय? मी खूप थकलेय. आता मला झोपायचे आहे. कधीही न जागे होण्यासाठी...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.