जेव्हा `बाँड` भावूक होतो.. तेव्हा `स्कायफॉल` होतो

जेम्स बाँडच्या इतर सिनेमांपेक्षा या ‘स्कायफॉल’ चित्रपटाचा विषय फार वेगळ्या धाटणीचा आहे. बाँडची नेहमीची हत्यारं या चित्रपटात दिसलेली नाहीत. उलट काहीवेळा भूतकाळातील गोष्टींचा जास्त प्रभाव पडतो, यातच चित्रपटाचं सार आहे. एरव्ही बाँड आपल्याला एका सुपर स्पायच्या भूमिकेत दिसतो, पण या चित्रपटात तो भावूक भूमिकेत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 5, 2012, 11:11 AM IST

www.24taas.com, मुंबई
जेम्स बाँडच्या इतर सिनेमांपेक्षा या ‘स्कायफॉल’ चित्रपटाचा विषय फार वेगळ्या धाटणीचा आहे. बाँडची नेहमीची हत्यारं या चित्रपटात दिसलेली नाहीत. उलट काहीवेळा भूतकाळातील गोष्टींचा जास्त प्रभाव पडतो, यातच चित्रपटाचं सार आहे. एरव्ही बाँड आपल्याला एका सुपर स्पायच्या भूमिकेत दिसतो, पण या चित्रपटात तो भावूक भूमिकेत आहे.
सतत भविष्यातील घटनांवर लक्ष केंद्रीत करणारा बाँड या चित्रपटात मात्र भूतकाळातील आठवणींनी ग्रासलेला असतो. जॅम्स बाँडचे सिनेमात नेहमी अक्शन थ्रिलर असतो पण यात असं जास्त काहीच नाही, स्कायफॉल चित्रपट चक्क प्रेक्षकांना इमोशनल करणार आहे. सिनेमा इमोशनल असून थेट काळजात हात घालणार आहे. चित्रपटातून असा संदेश मिळतो की तुम्ही जेव्हा एकटे पडता किंवा तुमच्यावर एखादा आघात होतो तेव्हा तुम्हालाच स्वतःची शक्ती वापरावी लागते. बाँडचे थ्रिलर असणारे सिनेमे यात माणुसकीचा संदेश देत आहे. सिनेचाहत्यांसाठी तसंच बाँडच्या चाहत्यांसाठी स्कायफॉल चित्रपद अगदी वेगळा असणार आहे. स्कायफॉल पाहताना प्रेक्षक जेम्सच्या आधीच्या चित्रपटातील भूमिका आठवून चकित होतील.
डॅनियल क्रॅग(जेम्स बाँड) हा ‘एमआय सिक्स’ ब्रिटिश सरकारच्या हेर खात्याचा गुप्तहेर असतो. तुर्कस्तानात एका मोहिमेत असताना क्रॅगला गोळी लागते आणि त्याचं मानसिक-शारिरीक शक्ती कमी होते. त्याची बॉस ज्युडी डेंचही (एम) संकटात असल्याने त्याला मदत करू शकत नाही. अतिरेकी एमआय सिक्सची इमारत उडवतात, राऊल सिल्व्हा हा ‘एमआय सिक्स’चा आधीचा गुप्तहेरच जॅम्सच्या मागे असल्याचं त्याला समजू लागत. तो जॅम्सशी असं का वागत असतो, कसे एक-एक वाद समोर येत जातात, तसंच राऊल, एम आणि बाँडमध्ये कोण जिंकत यात संपूर्ण चित्रपटाची कहाणी सामावली आहे.
दिग्दर्शक सॅम मेंडिसने स्कायफॉल अगदी आकर्षिक सिनेमा तयार व्हावा या मुद्द्यावर अगदी बरोबर कामगिरी केली आहे. अक्शनपासून रोमान्सपर्यंत सगळंकाही त्याने बाँडकडून करून घेतलं आहे. बाँडची एँट्री अगदी दणक्यात दाखवली गेली आहे. चित्रपट तांत्रिकदृष्ट्रया अगदी परिपूर्ण आहे. जॅम्ससोबत इतर कलाकारांनी चित्रपटाला यशस्वी करण्यात बरोबरीची कामगिरी केली आहे. एकंदरित पाहायला गेलं तर ‘स्कायफॉल’ सिनेचाहत्यांना खूश करणारा चित्रपट आहे. अडीज तास सिनेमा गृहात अक्शन, रोमॅन्स तसंच इमोशनल सिन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनी हा आकर्षक चित्रपट नक्कीच पाहावा.