‘इफ्फी’ची सांगता... मराठमोळी अंजली ठरली 'सिल्व्हर पिकॉक'

चित्रपटसृष्टीचा महाकुंभ असलेल्या गोव्यातील 43 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सांगता झाली.

Updated: Dec 1, 2012, 08:49 AM IST

www.24taas.com, गोवा
चित्रपटसृष्टीचा महाकुंभ असलेल्या गोव्यातील 43 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सांगता झाली.
पंजाबचा `अनहे घोरे दा दान` हा सिनेमा इफ्फीच्या गोल्डन पिकॉक पुरस्काराचा मानकरी ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा सिल्व्हर पिकॉक पुरस्कार मराठमोळ्या अंजली पाटील हिनं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पोलंडच्या मार्सिन डोरोसिंस्कीनं पटकावला.
इफ्कीच्या सांगता सोहळ्याप्रसंगी दाक्षिणात्य अभिनेता नंदमुनी बालकृष्णा यांनी हजेरी लावली होती. तसच ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक पॉल कॉक्स, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, गोव्याचे राज्यपाल व्ही.बी. वांछू हेही उपस्थित होते.

२२ नोव्हेंबर रोजी उद्घाटन झालेल्या ४१ व्या आंतरराष्ट्रीय व गोव्यातील ७ व्या इफ्फीचा समारोप सोहळा कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात शुक्रवारी पार पडला. यंदाच्या इफ्फीसाठी सुमारे साडेआठ हजार प्रतिनिधींची नोंदणी झाली होती. ६१ देशांतील सुमारे ३०० चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले.