बलात्कारांना मी जबाबदार नाही- पूनम पांडे

“मी जन्माला येण्यापूर्वीही बलात्कार होत नव्हते का? त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बलात्कारांना मी जबाबदार नाही” असं पूनम पांडेने म्हटलं आहे. बलात्काराच्या घटनांबद्दल पूनम पांडेच्या चिथावणीखोर फोटोंना जबाबदार धरल्याबद्दल पूनम हे वक्तव्य केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 27, 2013, 09:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
“मी जन्माला येण्यापूर्वीही बलात्कार होत नव्हते का? त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बलात्कारांना मी जबाबदार नाही” असं पूनम पांडेने म्हटलं आहे. बलात्काराच्या घटनांबद्दल पूनम पांडेच्या चिथावणीखोर फोटोंना जबाबदार धरल्याबद्दल पूनम हे वक्तव्य केलं आहे.
“महिलेशी संबंधित गुन्हेगारीवर ‘नशा’ हा माझा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर मुंबईत फोटोग्राफर जर्नलिस्टवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं मला खूप दुःख होत आहे. माझ्या ‘नशा’ या सिनेमाची कथा अशाच घटनेवर आधारित आहे” असं पूनम म्हणाली.
“मी एक मुलगी असून, या जगामध्ये मी स्वतःसाठी जागा निर्माण करत आहे. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजले असताना मला का जबाबदार धरलं जातंय? मी तर फक्त बोलते, करत काहीच नाही. सिनेमातील अश्लील दृश्यं तर मी पण पाहाते. अशी दृश्यं पाहून कुणाला बलात्कार करण्याचं सुचू शकत नाही.” असंही पूनम म्हणाली.
याशिवाय ‘आयटम साँग’ करणाऱ्या अभिनेत्रींचा आदर करा असा सल्लाही पूनमने दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.