बिग बी फेसबुक करोडपती

`कौन बनेगा करोडपती` च्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जागा करणाऱ्या अमिताभ बच्चन फेसबुकचा करोडपती झाला आहे.

Updated: Mar 6, 2014, 05:36 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
`कौन बनेगा करोडपती` च्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जागा करणाऱ्या अमिताभ बच्चन फेसबुकचा करोडपती झाला आहे.
फेसबुकवर बिग बी ने एक करोड लाईक्स पार केले आहेत.
बिग बीने हा आनंद फेसबुकवर ५०८ वी पोस्ट लिहून व्यक्त केला. `सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद. माझ्या दिवसाची खूपच सुंदर सुरुवात झाली आहे`, असे बिग बीने पोस्टमध्ये लिहिले आहे.
बिग बीने सोशल साईटवरची सुरुवात ब्लॉगिगने केली. ट्वीटरही बिग बीच्या चाहत्यांची संख्या ८१ लाख आहे.
अर्थात बिग बी थोड्याच दिवसात ट्वीटर करोडपतीही बनतील. सोशल साईटवर बिग बी स्टार अपील आणि त्यांची लिहिण्याची कला यांमुळे प्रसिद्ध आहेत.

गेल्या २८ वर्षापासून अमिताभ प्रत्येक रविवारी त्यांच्या बंगल्याबाहेर येऊन, चाहत्यांना शूटचे फोटो, एखादा घडलेला किस्सा शेअर करत असतात. यामुळे त्यांच्या चाहत्यांना अमिताभच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी समजतात.
अमिताभ सोशल मीडीयांवर येणाऱ्या नवीन पिढीबद्दल कधीच वाईट बोलले नाही. उलट त्यांना योग्य ते मार्गदर्शनचं केले. `आजच्या काळात सर्वात मोठ वरदानं सोशल मीडीया आहे.
आपण मन रमण्यासाठी पुस्तके वाचतो, फिरायला जातो. मात्र सोशल मीडियावरची मजा काही वेगळीचं आहे. हे सर्व खूप अविस्मरणीय आहे.`, असे अमिताभ यांनी १ मार्च, रोजी लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.