...तो फोटो पाहून सलमान भडकला

नेहमीच आपल्या अंगप्रदर्शन करण्यात प्रसिद्ध असलेला सलमान खान मात्र फेसबुकवरील फोटो पाहून चिडलाय. एरव्ही चित्रपटातून, जाहिरातीतून शर्ट काढून बाह्या दाखवणाऱ्या सलमानला त्याचा उघडबंब फोटो पाहून संताप अनावर झाला.

Updated: Jul 9, 2013, 05:24 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
नेहमीच आपल्या अंगप्रदर्शन करण्यात प्रसिद्ध असलेला सलमान खान मात्र फेसबुकवरील फोटो पाहून चिडलाय. एरव्ही चित्रपटातून, जाहिरातीतून शर्ट काढून बाह्या दाखवणाऱ्या सलमानला त्याचा उघडबंब फोटो पाहून संताप अनावर झाला.
सलमानचा अंगप्रदर्शन करणारा फोटो फेसबुक तसेच अन्य सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून शेअर केला जात आहे. त्यावर कमेंट्सही पोस्ट होत आहेत. फोटोमध्ये सलमान खान आपल्या मित्रांसोबत आणि भावांसोबत मजामस्ती करताना दिसतोय. या फोटोत कुणाच्याही अंगावर शर्ट नाही. सगळेजण फक्त जीन्सवरच दिसत आहेत. यात सलमानचे दोन्ही भाऊ सोहेल आणि अऱबाज दबंग स्टाईलमध्ये दिसत आहेत. फोटोमध्य़े मद्याच्या बाटल्याही दिसत आहेत. त्यामुळे सल्लू ढोसून नाचगाणी करतोय का असे प्रथमदर्शनी दिसतेय. आपला हा अवतार पाहून सलमान भडकला.

खरंतर सलमान वैयक्तिक जीवन कधीच कोणासमोर उघड करत नाही. त्याला त्याचे वैयक्तिक जीवन शेअर करायला आव़डत नाही. त्यामुळेच आपली खासगी बाब लोकांसमोर विचित्र पद्धतीने आणली गेल्यामुळे सल्लू नाराज आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.