www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचं निधन झालंय. लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय. प्राण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राण यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात य़ेणार आहेत.
नुकताच त्यांचा चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळेक पुरस्काराने गौरव करण्यात आला होता..वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बेईमान, ऑसू बन गये फूल आणि उपकार या त्यांच्या चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. जंजीर, नास्ति, अंधा कानून, अमर अकबर अँथनी, धरमवीर, चोरी चोरी, मुनीमजी, आह, हाफ तिकीट, गुमनाम असे एकाहून एक सिनेमांतून त्यांच्या भूमिका गाजल्या...प्राण यांनी ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
अभिनेते प्राण यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केलाय.. आपल्या सहज आणि जिवंत अभिनयानं चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण किशन सिकंद यांच्या निधनानं अभिनयाच्या साम्राज्यातील शेरखान हरपल्याचं ते म्हणालेत. गेली सहा दशके त्यांनी आपल्या विविधांगी अभिनयानं रसिकांची मनं जिंकली. हिंदी चित्रपट सृष्टीतील हा लव्हेबल व्हिलन चित्रपट रसिका कधीही विसरणार नाहीत अशा शद्बांत त्यांनी प्राण यांना आदरांजली वाहिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.