www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
कमी वेळ आणि पैसे दुप्पट, या आमिषाला अनेक जण बळी पडतात. आता यातच अभिनेता अक्षय खन्नाची भर पडलीय. कारण, अक्षयला पन्नास लाखांचा गंडा बसलाय. घसघशीत व्याजाच्या आमिषाला तो बळी पडला आणि त्यानं आपले ५० लाख रुपये गमावलेत.
अक्षय खन्नानं या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. इंटॅक्ट इमिजिएट प्रा. लि. या कंपनीचे अध्यक्ष सत्यब्रत चक्रवर्ती आणि संचालक सोना चक्रवर्ती यांनी २०१०मध्ये अक्षय खन्नाची भेट घेऊन आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, काही महिन्यांत दामदुप्पट करून देतो, असं आमिष दाखवलं. पैसे दुप्पट होणार म्हणून अक्षयही या दाव्यांना बळी पडला आणि त्यानं तब्बल ५० लाख रुपये चक्रवर्तीकडे गुंतवले.
मात्र नंतर मूळ रकमेसह ठरलेली जादा रक्कम दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अक्षय खन्नानं अॅूड. राजेंद्र धुरू यांच्यामार्फत चक्रवर्ती आणि त्याची पत्नी सोना आणि अन्य साथिदारांविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. अक्षय खन्नाच्या या तक्रारीनुसार मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.