शुक्रवारी तब्बल 10 सिनेमांची ट्रीट

या आठवड्याचा शुक्रवार आणि त्यानंतर येणारा विकेण्ड सिनेप्रेमींसाठी जणू उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला धमाका आहे. कारण या विकेण्डला सिनेप्रेमींसाठी सहा हिंदी, तीन मराठी आणि एक इग्लिश अश्या तब्बल 10 सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. लेट्स हॅव अ लूक.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 8, 2014, 09:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
या आठवड्याचा शुक्रवार आणि त्यानंतर येणारा विकेण्ड सिनेप्रेमींसाठी जणू उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला धमाका आहे. कारण या विकेण्डला सिनेप्रेमींसाठी सहा हिंदी, तीन मराठी आणि एक इग्लिश अश्या तब्बल 10 सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. लेट्स हॅव अ लूक.
या विकेण्डला तुम्ही सिनेमा पाहाण्याचा प्लॅन करत असाल जर जरा थांबा. कारण प्लॅन करताना तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला जरा अर्लट करतोय. कारण या विकेण्डला तब्बल 10 सिनेमांची ट्रीट तुम्हाला मिळतेय. यातला कोणता सिनेमा पाहायचा हे तुम्ही ठरवा.
अगदी सुरुवातीला हिंदीतल्या सहा सिनेमाबद्दल. हिंदीत या विकेण्डला बिग बजेट. बिग स्टारर असा एकही सिनेमा नसला तरीही तारे जमीपर फेम अमोल गुप्तेचं दिग्दर्शन असलेला स्केंटिंगवर आधारीत असा हवाहवाई सिनेमा पाहाण्यासारखा आहे. तर सुनील शेट्टीचे तुम्ही फॅन असाल तर ब-याच वर्षानंतर त्याच कमबॅक होतंय ते कोयलांचल नेमातून.
कोळसामाफियांच्या जादागिरीविरोधात ह्या सिनेमात भाष्य करण्यात आलंय. तर सत्यघटनेवर आधारीत असलेला मंजूनाथ सिनेमाही पाहण्यासारखा आहे. तेलमाफीयांविरुध्द लढताना एका तरुणाची झालेली हत्या या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. तर खेळाडूंच्या स्वप्नावर आधारीत ख्वाब.
ग्रामीण पार्श्वभूमी असलेला सामाजिक-राजकीय परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करणारा ये है बकरापूर आणि मस्तराम या छोट्या सिनेमाचाही ऑप्शन तुमच्यासमोर आहे. हा मात्र मराठी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर उर्मिला मांतोडकरची मराठीत एन्ट्री झालेला आणि शाळा फेम सुजय डहाकेचं दिग्दर्शन असलेला आजोबा सिनेमा या सगळ्यांपेक्षा काहीसा वेगळा अनुभव देणारा नक्कीच ठरेल.
तर एका तरुणाचा थक्क करणारा प्रवास रेखाटण्यात आलाय भाकरखाडी या सिनेमात तर एक हाजाराची नोट हा सिनेमाचा विषयही मराठीसाठी जरा वेगळाच आहे...तर हॉलिवूडप्रेमींसाठी मिलियन डॉलर् आर्म या सिनेमाची ट्रीट आहे. दोन प्रसिध्द बेसबॉल प्लेअर्सच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. बॉक्सऑफीसवर दहा सिनेमांचा धमाका तर आहे.कोणत्या सिनेमात काय आहे हे ही आम्ही तुम्हाला सांगितलं. सो चॉईस इज युवर्स फ्रेंडस.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.