रिव्ह्यू: `हिरोपंती` अतिउत्साही मुलाचा हिरो बनण्याचा प्रयत्न!

बॉलिवूडमध्ये सध्या न्यू टॅलेंटची खूपच बहार आलीय. मग तो कोणता स्टार पुत्र असो किंवा बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेला व्यक्ती. या आठवड्यात जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफचा `हिरोपंती` रिलीज झाला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 24, 2014, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमध्ये सध्या न्यू टॅलेंटची खूपच बहार आलीय. मग तो कोणता स्टार पुत्र असो किंवा बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेला व्यक्ती. या आठवड्यात जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफचा `हिरोपंती` रिलीज झाला. टायगरला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी जॅकीनं खूप वाट पाहिली. चित्रपटाची कथा ही विशेष नाही तर रुटीन आबे. मात्र चित्रपटाची ट्रीटमेंच आणि फ्रेश चेहरे आपल्याला अपिल करतात. कृतिची स्माईल आणि तिच्या अदा तर टायगरची एक्शन आणि डांस पैसा वसुल आहे.
चित्रपट: हीरोपंती
प्रोड्यूसरः साजिद नाडियाडवाला
डायरेक्टरः सबीर खान
कलाकारः टाइगर श्रॉफ, कृति सेनन, प्रकाश राज आणि विक्रम सिंह
पटकथेत किती दम?
`हिरोपंती` तेलुगु सिनेमा `परुगु`चा रिमेक आहे. चित्रपटात एक तरुण बबलू (टायगर) आणि तरुणी डिंपी (कृति) आहे. दोघांची भेट होते, प्रेम होतं आणि ते `दो जिस्म एक जान` होतात. मग प्रेम असेल तिथं ते मिटवणारे शत्रूही आपोआप येतातच. त्याच शत्रूंचा मुकाबला करण्याची कहानी म्हणजे `हिरोपंती`. बबलू आणि डिंपी आपल्या प्रेमासाठी सर्वांसोबत लढायला तयार. जर पाहिलं तर ही रुटीन प्रेम कहानी. संपूर्ण चित्रपटात पुढं काय होणार हे आपल्याला कळत राहतं. पटकथेच्या रुपात हिरोपंती रुटीन आहे काहीच विशेष नाही.
कलाकार आणि अभिनय
कमकुवत पटकथेमुळं टायगर एव्हरेज दिसतो. शिवाय त्याला आपली एक्टिंग आणि डायलॉग डिलीव्हरीवर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. चित्रपटात अनेक ठिकाणी डायलॉग बोलतांना तो फ्लॅट होतो. एक्सप्रेशनही मॅच होत नाहीत. मात्र एक्शन आणि डांसच्या बाबतीत टायगर महारथीच आहे. चित्रपटात जिथं टायगर एक्शन करतो तिथं नक्कीच शिट्ट्या वाजतात. तर शिट्टी वाजवण्यासारेख डायलॉग मात्र अतिशय साधारण पद्धतीनं बोलले जातात.
कृति सेनन चार्मिंग आहे. मात्र चित्रपट टायगरचा होता. दोघांची केमेस्ट्री लक्षात राहिल अशी नाहीय. प्रकाश राज एक्टिंग करता-करता ओव्हरएक्टिंग करुन जातात. आता त्यांना या इमेजमधून बाहेर यायला हवं.
बॉक्स ऑफिस कमाई?
ज्यांना एक्शन फिल्म आणि लव्हस्टोरी आवडते त्यांच्यासाठी हिरोपंती मसाला फिल्म आहे. चित्रपटाचं संगीत हा एक प्लस पॉईंट आहे. एक्शन तर जबरदस्त. चित्रपट तरुण आणि प्रेमियुगुलांना लक्षात ठेवून बनवली आहे. जर तरुण या चित्रपटाकडे ओढले गेले तर फिल्म नक्की कमाई करेल. जर कमकुवत कथेमुळं जर चित्रपट अडकला तर बॉक्स ऑफिसवर टायगरला राहणं कठीण होवून जाईल.
विविध चित्रपटवाहिन्यांवरून डब करून दाखविलेले दक्षिणेकडील चित्रपट आणि `हिरोपंती` यामध्ये काहीच फरक नाही. म्हणजे एकूणच काय तर हिरोपंती म्हणजे आनंदी आनंदच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.