www.24taas.com,मुंबई
मोठ्या पडद्यावर गायिका आशा भोसले ‘माई’ या चित्रपटाच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गरीब कुटुंबांची कथा ‘माई’ या सिनेमातून साकारली आहे. मला ‘माई’ची ओढ निर्माण झाली आणि मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला, असे आशाताई सांगतात. मात्र, संगितक्षेत्रात काम करताना पडद्यावरील त्यांचे काम जरी चांगले असले तरी कथानकाने मार खल्ल्याचे दिसत आहे. ८० वर्षीय आशा भोसलेंनी माईच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केलाय.
‘माई’ हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. ज्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पहिला आहे त्यांना कथेची नक्कीच कल्पना असेल. अल्झायमर या विकाराने ग्रस्त असलेल्या एका गरीब आईची कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, या चित्रपट विषय याआधी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट विचार करायला भाग पाडत नाही. आई आणि मुलीच्या नात्यांचा भावस्पर्शी हा चित्रपट वाटतो. आशा भोसलेंच्या लेकी म्हणजे मधुची व्यक्तिरेखा पद्मिनी कोल्हपुरे हिने साकारली. ‘माई’ या सिनेमाचे कथानक रटाळ वाटते. त्यामुळे तो तुमच्या पसंतीला पडेल का?
परदेशात नोकरी मिळाल्याने ‘माई’ ची जबाबदारी त्यांचा मुलगा मुन्ना धुडकावतो. त्यानंतर माईंच्या दोन मुलींपैकी मोठी मुलगी मधु पती आणि मुलीच्या विरोधात जाऊन वृद्ध आईची जबाबदारी स्विकारते. ऑफिसच्या प्रचंड ताण आणि घरची आणि आईची जबाबदारी सांभाळताना मधुची तारांबळ उडते. माईंच्या बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे मधुला नोकरी सोडायला लागते. त्यानंतर तिची ओढातान होते का, की तिचा पती आणि मुलगा तिच्यासाठी काय करतो, हे पडद्यावर पाहायल्यावर समजेल.
मधुचा नवरा पत्रकार सुभाष हा समंजस असूनही आपल्या सासूची जबाबदारी नाकारतो आणि नंतर त्याचा विचार बदलतो ही गोष्ट पचनी पडत नाही. नव-याचा आणि वडिलांचा अभिनय राम कपूरने चांगला साकारला आहे. अनुपम खेरची लहानशी पण उठावदार व्यक्तिरेखा लक्षात राहते.
आई-वडिलांबद्दल आपले प्रेम चिरंतन हवे याची मधु प्रेक्षकांना आठवण करून देते. माईंची भूमिका साकारणाऱ्या आशा भोसलेंशिवाय या चित्रपटात काहीच नवीन गोष्ट नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या चित्रपटाची असणारी उत्सुकता माई सिनेमा पाहिल्यावर स्पष्ट होते. अल्झायमरने ग्रस्त असलेल्या माईची कथा अनेकांच्या ह्रदयात घरही करु शकते. मात्र हा विषय आधी आलेला असल्याने त्यात नाविन्य वाटत नाही.
‘लडकीयों को उनकी उमर नही पुंछते` असे गमतीने म्हणणाऱ्या माई आणि हॉस्पिटलमध्ये वेदनेने कळवळून अखेरीस माईंचा होणारा मृत्यू हा चित्रपटाचा शेवट मनाला लागून जातो. आशा भोसलेंच्या अभिनयासाठी हा भावनाप्रधान चित्रपट पाहायला हरकत नाही.