भूताचे चित्रपट मानगुटीवर न बसो - बिपाशा

भयपट निर्मात्यांची बिपाशा बसू आवडती अभिनेत्री बनत चालली आहे. ‘राज ३’ या सिनेमानंतर ती आता सुवर्णा वर्मा यांच्या आगामी हॉरर फिल्म ‘आत्मा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला बिप्स येणार आहे. सोमवारी या सिनेमाचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 12, 2013, 05:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
भयपट निर्मात्यांची बिपाशा बसू आवडती अभिनेत्री बनत चालली आहे. ‘राज ३’ या सिनेमानंतर ती आता सुवर्णा वर्मा यांच्या आगामी हॉरर फिल्म ‘आत्मा’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला बिप्स येणार आहे. सोमवारी या सिनेमाचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला.
यावेळी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रकाशित करण्यात आलं. या वेळी बिप्सने म्हणाली, ‘मी भयपट करणारी अभिनेत्री अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा प्रकारचे सिनेमे करण्यात काही आक्षेपार्ह वाटत नसल्याचं तीने सांगितलं.
भयपट तयार करणे ही एक स्वतंत्र शैली आहे. दिग्दर्शक असे सिनेमे बनवण्यासाठी उत्सुक आहेत. प्रेक्षकांनाही असे सिनेमे पाहण्याची इच्छा असते. आपल्या नव्या भयपटाबद्दल बिपाशाने सांगितलं, की या सिनेमात तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत.
‘आत्मा’ या चित्रपटाची कथा आणि पटकथा मला खूप आवडली. म्हणून मी या चित्रपटात करण्याची इच्छा व्यक्त केली. भारतात अशा प्रकारचे सिनेमे अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. असं बिपाशा बसू म्हणाली. ‘आत्मा’ या सिनेमात गँग ऑफ वसेपुर फेम अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा आपल्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल.