Bahubali 2 Review : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अखेर उत्तर

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर अखेर बाहुबली २ मध्ये मिळतंय का? याची उत्कंठा सर्वांना लागून आहे. बाहुबली २ मध्ये याचं उत्तर मिळालं का ते तुम्हाला बाहुबली २ पाहिल्यानंतर मिळणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 28, 2017, 04:29 PM IST
Bahubali 2 Review  : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अखेर उत्तर title=

(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबई : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर अखेर बाहुबली २ मध्ये मिळतंय का? याची उत्कंठा सर्वांना लागून आहे. बाहुबली २ मध्ये याचं उत्तर मिळालं का ते तुम्हाला बाहुबली २ पाहिल्यानंतर मिळणार आहे.

प्रत्येक सिनेमाचा दुसरा भाग पहिल्या भागाएवढा उत्कृष्ट असेलंच असं नाही, पण बाहुबली २ हा  बाहुबली १ एवढाचा चांगला झाला आहे. स्वामीभक्त की राष्ट्रभक्त हे गुण एकाच माणसात असले, तर त्याला किती कठीण निर्णय घ्यावे लागतात, हे बाहुबली २ मध्ये अनुभवता येईल.

हिरो शिवाय दुसऱ्याकडून सिनेमा वठवणं कठीण असतं म्हणतात, पण सिनेमॅटीक लिबर्टीचा विचार केला, तर बाहुबली ज्याला कटप्पाने मारलं होतं, तेव्हढ्याच ताकदीचा बाहुबलीची जागा भरून काढणारी भूमिका, दिग्दर्शकाने समोर आणली आहे.

'जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारनेवाला पैदा नही हुआ मामा', असं वाक्य बाहुबली२ च्या प्रोमोत आहे, हे वाक्य आणि दृश्य सिनेमातही तेवढंच महत्वाचं ठरतं. एवढंच नाही, तर 'अमरेंद्र' बाहुबली हे बाहुबली १ मधील लक्षात राहणारं वाक्य होतं, बाहुबली २ च्या प्रोमोत 'महेंद्र' बाहुबली म्हटलं गेलं आहे. अमरेंद्र ते महेंद्र हे नेमकं काय आहे, यांचा संबंध काय हे आताच सांगता येणार नाही यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

सिनेमा पाहावा लागेल असं यासाठी म्हणतोय की, तुम्हाला बाहुबली २ पाहून सिनेमा पाहण्याचं समाधान निश्चितच लाभेल. पिक्चरायझेन, व्हीएफएक्स इफेक्ट अदभूत वातावरण स्क्रीनवर तयार करतात. हा अदभूत बाहुबली २ निश्चित पाहा. 

बायको आणि मुलापेक्षाही जास्त प्रेम बाहुबलीचं आईवर असतं, आणि त्याच्या आईला बाहुबलीविषयी आधी, आणि नंतर काय वाटतं, हे सुद्धा जाणून घेण्यासारखं आहे. बाहुबलीकडून आईवर, की आईकडून बाहुबलीवर अन्याय झालाय का? हे सुद्धा सिनेमाच पाहा...तुमचं आईवरचं प्रेम आणि आईचं मुलावरचं प्रेम निश्चितच वाढेल. थोडक्यात बाहुबली २ बेस्ट सिनेमा म्हणता येईल, नक्की पाहा. तुमचे तीन तास तुम्हाला वाया गेले असं तुम्हाला वाटणार नाही.

मी बाहुबली १ पाहिला नव्हता, तरीही मला बाहुबली २ चं कथानक लक्षात आलं, बाहुबली १ न पाहता, बाहुबली २ कसा वाटतो, कथानक समजतं का? , याचा देखील समोर ठेवण्याचा आमचा उद्देश होता.