www.24taas.com, मुंबई
आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तिचं निधन झाल्यानंतरही कधी कधी ती व्यक्ती आपल्या स्वप्नात वारंवार येते. आपल्या मनावर त्या व्यक्तीच्या मृत्यूचा परिणाम झाल्यामुळे हे घडतं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते चूक आहे. नुकत्याच मरण पावलेल्या व्यक्ती वारंवार स्वप्नांत येणं अशुभ असतं.
जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्या अतृप्त इच्छा ठेवून मरण पावल्यामुळे जाताना अशा व्यक्ती असंतुष्ट असतात. त्यांच्या मनातील दुःख, चिंता बाकी राहिल्या असतात. याच गोष्टींच सावट आपल्यावर पडत असतं. त्यांच्या आत्म्याला शांती न मिळाल्याचं ते स्वप्नांत येऊन सांगायचा प्रयत्न करत असतात.
मृत व्यक्तिंचे आत्मे अतृप्त राहू नयेत, म्हणून काही साध्या उपाययोजना कराव्यात. रोज भगवद्गीतेचे पाठ वाचावेत. गयेला जाऊन ब्राह्मणांकडून विधिपूर्वक श्राद्ध करावे. गरीब व्यक्तींना दान धर्म करावा. यामुळे मनाला शांतता लाभते. अतृप्त आत्म्यांना समाधान मिळते. आणि त्यांचं स्वप्नात येणं बंद होतं.