नेमकी का घातली जाते सत्यनारायणाची पूजा?

मुंबई : हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे.

Updated: Sep 2, 2016, 09:20 PM IST
नेमकी का घातली जाते सत्यनारायणाची पूजा? title=

मुंबई : हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे. भगवान विष्णूंना नारायण रुपात पुजणे यालाच 'सत्यनारायण' म्हणतात.

विद्वानांच्या मते स्कंद पुराणातील रेवा खंडात याचा उल्लेख आहे. यातील श्लोक पाचही खंडांत विभागले गेले आहेत. यात एकूण १७० श्लोकांचा समावेश होतो.

सत्यनारायणाच्या कथेचे दोन प्रमुख विषय आहेत. यातील एक विषय आहे संकल्प करणे आणि दुसरा आहे प्रसाद.

 

सत्यनारायणाच्या कथा अनेक लहान लहान खंडांत विभागल्या गेल्या आहेत. यातील एक महत्त्वाची बाब अशी की त्यात सत्याला महत्त्व दिले गेले आहे. जो सत्याचे पालन केरत नाही, त्याचे आयुष्यात नुकसान होईल, असे ही कथा सांगते.

सत्याचे पालन न करणाऱ्याला भगवानच स्वतःच शिक्षा देतील असेही कथेत म्हटले आहे. म्हणूनच या कथेचे वाचन संपूर्ण कुटुंबाच्या समोर केले जाते.  

सत्याची नारायण स्वरुपात पूजा करणे हे या कथेचे सार आहे. नारायण हेच सत्य असून बाकी जग मोह-माया आहे, तेव्हा नारायणाच्या पूजेत मन रमवा आणि सत्याची कास धरा, असा सल्लाही सत्यनारायणाच्या कथेतून मिळतो.