पाहा, तुमचा विवाह कधी होईल?

विवाह रेषा ही हाताच्या पंजावर, करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वरती असते. या रेषांवरून संबंधांमधील सलोखा, वैवाहिक जीवनातील आनंद आणि पती-पत्नी यांच्यातील प्रेम आणि स्नेहाच्या अस्तित्वाचा संकेत मिळतो.

Updated: Dec 30, 2015, 01:36 PM IST
पाहा, तुमचा विवाह कधी होईल? title=

मुंबई : विवाह रेषा ही हाताच्या पंजावर, करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वरती असते. या रेषांवरून संबंधांमधील सलोखा, वैवाहिक जीवनातील आनंद आणि पती-पत्नी यांच्यातील प्रेम आणि स्नेहाच्या अस्तित्वाचा संकेत मिळतो.

मात्र विवाह संबंधित सुखी आनंदी जीवनाचं भविष्य शुक्र पर्वत आणि हृदय रेषेला ध्यानात ठेऊनही करता येऊ शकतं.

विवाह रेषेचे वेगवेगळे प्रकार आणि स्थिती असते, ही स्थिती विवाह संबंधित सुखी जीवनाची भविष्यवाणीत महत्वाची ठरते. विवाह रेषेचा आकार आणि त्याच्या स्थितीविषयीची माहिती खाली देण्यात आली आहे.

१) विवाह रेषा जर हृदय रेषेच्या जवळ असेल, तर अशा व्यक्तीचा विवाह १४ ते २१ वर्षाच्या आत कमी वयात होतो.
२) विवाह रेषा जर मध्यम स्थितीत असेल, तर अशा व्यक्तीचा विवाह २१ ते २८ वर्षाच्या आत होतो.
३) विवाह रेषा जर त्यापेक्षाही दूर असेल, तर अशा व्यक्तीचा विवाह २८ ते ३५ वर्षाच्या आत झाला पाहिजे.