राशीवरुन जाणून घ्या तुमची गर्लफ्रेंड अथवा जोडीदार किती रागीट आहे ते

ऱाशींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर तसेच स्वभावावर पडत असतो. तुमचं लग्न ठरणार असेल तर राशीवरुन जाणून घ्या तुमची गर्लफ्रेंड अथवा होणारी जोडीदार किती रागीट आहे ते.

Updated: Sep 13, 2016, 04:56 PM IST
राशीवरुन जाणून घ्या तुमची गर्लफ्रेंड अथवा जोडीदार किती रागीट आहे ते title=

मुंबई : ऱाशींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर तसेच स्वभावावर पडत असतो. तुमचं लग्न ठरणार असेल तर राशीवरुन जाणून घ्या तुमची गर्लफ्रेंड अथवा होणारी जोडीदार किती रागीट आहे ते.

मेष -

या राशीच्या महिलांना शक्यतो राग येत नाही. मात्र जेव्हा येतो तेव्हा लवकर शांत होत नाही.

वृषभ -

या राशीच्या महिलांना खूप राग येतो. मात्र त्यांचा राग नियंत्रित करता येतो.

मिथुन -

या महिलांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन राग येत असतो. एखाद्या गोष्टीत समजावून येण्याची क्षमताही कमी असते. 

कर्क -

अनेकदा काही कारणांमुळे यांना लगेच राग येतो. 

सिंह -

या राशीच्या महिलांना स्वातंत्र्य आवडते. त्यामुळे यांचा राग अधिक असतो.

कन्या -

या राशीच्या महिला साध्या सरळ असतात. या राग फार क्वचित वेळा व्यक्त करतात. 

तूळ -

या राशीच्या महिला रागाबाबत समतोल साधून असतात. यांना राग येतो मात्र राग सहन करण्याचीही तितकीच क्षमता असते. 

वृश्चिक -

या राशीच्या महिलांना खूप इगो असतो. त्यामुळे राग लवकर येतो. तसेच तो लवकर कमी होत नाही.

धनू -

या राशीच्या महिला वेळ पाहून रागावतात. जेथे आपला राग सहन केला जाईल अशा व्यक्तींवरच या राग काढतात.

मकर -

या राशीच्या महिला चिडचिड्या असतात आणि प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करत असतात. 

कुंभ -

या महिला सहसा राग व्यक्त करत नाहीत. त्यामुळे या महिलांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नाही. 

मीन -

या राशीच्या महिला सहसा शांत स्वभावाच्या असतात. मात्र कधीतरी राग आल्यास त्याची तीव्रता मोठी असते. मात्र तो राग क्षणिक असतो.