श्रीकृष्णानं सांगितलेल्या या सफलतेच्या गोष्टी...

भगदवदगीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णानं केलेलं विविचन हे युवकांसाठी आजच्या काळातही तंतोतंत लागू ठरतं, असं कित्येकांचं म्हणणं आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 29, 2013, 08:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भगदवदगीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णानं केलेलं विविचन हे युवकांसाठी आजच्या काळातही तंतोतंत लागू ठरतं, असं कित्येकांचं म्हणणं आहे. संकटांचा सामना करताना गीतेतील पाठांमधून तणाव दूर ठेवण्यात अनेकांना य़श मिळालंय. आज आपण पाहणार आहोत गीतेच्या माध्यमातून सफलता मिळवण्यासाठी श्रीकृष्णानं तरुणांना दिलेले हे उपदेश...
दूरगामी विचार
गीतेतील अध्यायांच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या विचारांना संकुचित न ठेवता दूरगामी आणि व्यापक ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. उदाहरण द्यायचं झालं तर पांडव मेणाचं लाक्षागृह फसले असताना त्यांना केवळ एक उंदीर भेट म्हणून दिला त्यामुळेच पांडवांना लाक्षागृहातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला आणि त्यांनी स्वत:चा जीव वाचवला. हा दूरगामी विचारच ठरला होता.
संकटांना घाबरू नका
तुमच्या समोर समस्या असतील तर त्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही या संकटांना धैर्यानं तोंड देण्यात अपयशी ठरत असाल तर थोडं चिंतन करा आणि संकटांना सामोरं जा. संकटांना घाबरून त्यापासून दूर राहण्यापेक्षा त्यांचा सामना करण्यामुळेच त्यावर उत्तर मिळतं.
प्रगतीपथावरचे बदल स्वीकारा
प्रगतीपथावर असाल तर जीवनात बदल होणार, हे तर निश्चित... उदाहरण द्यायंच झालं तर, एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो आलेल्या संधी नाकारतोय... तर हा त्याचा मूर्खपणा ठरतो. एखाद्या गोष्टीचं आकर्षण तुमच्यामधली योग्यता मागे टाकतं. अशा वेळी भावनेच्या भरात वाहत जाऊ नका. प्रगती पथावरचे बदल स्वीकारण्यातच शहाणपणा आहे.
ऋषिकेश बनण्याचा प्रयत्न करा
श्रीकृष्णाला ऋषिकेशही म्हटलं जातं. ऋषक आणि इश म्हणजेच... इंद्रियांवर ताबा मिळवणारा स्वामी... आपल्या विचारांवर, बुद्धीवर, भावनांवर विजय मिळवणं तुम्हाला सफलतेकडे घेऊन जातं. गीतेच्या एका अध्यायानुसार, तुम्ही मनात आणलं तर तुम्हाला हवेवर नियंत्रण मिळवणंदेखील कठिण नाही... परंतु, तुम्हाला तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवणं मात्र थोडं कठिण आहे.

स्मृती, ज्ञान आणि बुद्धी
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर स्मृती आणि बुद्धी या महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. बुद्धी म्हणजेच वस्तूंना, घटनांना पारखण्याची क्षमता, ज्ञान म्हणजे सगळ्या बाजुंनी विचार आणि माहिती आणि स्मृती म्हणजे चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि वाईट गोष्टींना विसरून जाण्याची क्षमता... या तीन गोष्टींमध्ये यश मिळालं तर तुमच्याकडे सफलता चालत येईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.