www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुरुवात चांगली असेल तर आपले कामही योग्य पद्धतीने पूर्ण होते. यामुळे कधीही घराबाहेर पडताना काही परंपरागत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जसे की, घरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर ठेवावा.
आपल्या घरातील वृद्ध मंडळी वेळोवेळी आपल्याला घरातून बाहेर पडताना उजवा पाय बाहेर टाका असे सांगत असतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. कधीही घरातून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तेव्हा उजवा पाय आधी बाहेर ठेवल्याने तुम्हाला निश्चित यश मिळते या प्रथेमागे मानसशास्त्रीय आणि धार्मिक कारणे आहेत.
धर्म शास्त्रानुसार उजवा पाय आधी बाहेर ठेवणे शुभ मानले गेले आहे. सर्वच धर्मांमध्ये उजव्या अंगाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. उजव्या हाताने करण्यात आलेली कामेच शुभ मानले जातात. देवी देवतांनाही उजव्या हाताने केलेली कामेच मान्य आहेत. देवी देवतांशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या पूजा अर्चा उजव्या हातानेच करतात. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना आधी उजवा पाय बाहेर ठेवा. ही शुभ सुरुवात असेल. त्यामुळे शुभ फळ निश्चित मिळणार.
उजवा पाय बाहेर ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि मन प्रसन्न राहते. आधी डावा पाय बाहेर ठेवल्याने आपले विचार नकारात्मक बनतात. त्याचबरोबर घरातून निघताना दही-साखर चाखून बाहेर पडावे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.