सूर्यग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी हे उपाय करा

 फाल्गुन अमावस्येला (९ मार्च) ला या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण पूर्वोत्तर राज्यांसह मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळ, उज्जैनसह देशातील विविध भागात दिसणार आहे.

Updated: Mar 8, 2016, 03:51 PM IST
सूर्यग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी हे उपाय करा title=

नवी दिल्ली :  फाल्गुन अमावस्येला (९ मार्च) ला या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण पूर्वोत्तर राज्यांसह मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळ, उज्जैनसह देशातील विविध भागात दिसणार आहे.

ग्रहणाचे सूतक मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजेपासून लागणार आहे. ग्रहण सुरु झाल्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती होणार नाही. ज्योतिषानुसार ग्रहणाचा स्पर्श बुधवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी, मध्यकाल ७.२५ आणि मोक्ष ९.०८ मिनिटांनी होईल. सुर्योद्य सकाळी ६.४२ वाजत आणि सकाळी ६.४७ वाजेपर्यंत खग्रास स्वरुपात दिसेल. 

शास्त्रानुसार कुंभ राशीच्या पंचग्रही योगामध्ये ग्रहण आले आहे. ३२० वर्षानंतर हा योग असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. ज्योतिषांच्या मते कुंभ राशीमध्ये केतु, बुध, सूर्य, शुक्र आणि चंद्र राहतील.  सूर्यग्रहणामुळे १२ तास आधी सुरु होणाऱ्या सुतकामुळे आज सायंकाळी ६ वाजल्यापासून मंदिरातील कपाट बंद होतील. यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण संपल्यानंतर कपाट उघडले जातील. 

दरम्यान, हे ग्रहण भारतात केवळ काही वेळासाठीच दिसणार आहे. भारतात बुधवारी सकाळी ५.४३ मिनिटांनी ग्रहण लागेल. उत्तर पश्चिम आणि पश्चिम भाग सोडल्यास उर्वरित भारतात सकाळी ६.४७ मिनिटांपर्यंत राहील. 

या ग्रहणाचा कालावधी साधारण दीड तास असेल. सकाळी ग्रहण संपल्यानंतर स्नान-अभिषेक केल्यानंतर पूजापाठचा कार्यक्रम होईल. सूर्यग्रहणादरम्यान गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. गर्भशिशुवर ग्रहणाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने या काळाता त्यांना विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. शास्त्रामध्ये सूर्यग्रहणादरम्यान गर्भवती महिलांनी साडीच्या पदराला गेरु रंगाने रंगवल्यास बाळावर परिणाम होत नाही असे म्हटलेय. यादरम्यान देवपुजाही करणेही निषिद्ध मानले जाते. ९ मार्चला सूर्यग्रहण कुंभ राशी अथवा भाद्रपद नक्षत्रात असेल. ग्रहण संपल्यानंतर नदीमध्ये स्नान केल्यास ग्रहणाचे वाईट परिणाम टाळता येतात.