माशांना खाऊ घाला आणि आनंदी राहा...

मनुष्याच्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक सुख आणि दुःख. काही लोकांच्या आयुष्यात दु:ख अधिक असतात तर काहींच्या आयुष्यात सुख अधिक असते. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुख प्राप्त होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 30, 2014, 07:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनुष्याच्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक सुख आणि दुःख. काही लोकांच्या आयुष्यात दु:ख अधिक असतात तर काहींच्या आयुष्यात सुख अधिक असते. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुख प्राप्त होते.
शास्त्रात सर्व दुःखांचा नाश करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला गेला आहे. कणकीच्या छोट्या-छोट्या गोळ्या तयार करून त्या माशांना खाऊ घाला. जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल तर हा उपाय आवश्य करा. माशांना अन्न खाऊ घालणे शुभ कर्म मानले जाते. त्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते. विष्णूने मत्स्य अवतार धारण केलेला होता, त्यामुळे माशांना जास्त महत्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे
असं मानलं जातं की, मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार मनुष्याला पुढील जन्म प्राप्त होतो. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर त्याने जास्त पुण्य कर्म करावेत. त्यामुळे मागील जन्मात केलेल्या पापांचा नाश होतो. पुण्य कर्म केल्याने दुःखाचा प्रभाव कमी होतो आणि मनुष्याला आयुष्यात सुखाची प्राप्ती होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.