जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी...

आयुष्यातील खाच-खळगे समजावून घेऊन त्यापासून मार्ग काढणारा व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. पण, हे खाच-खळगे समजणार तरी कसे?

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 12, 2013, 08:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयुष्यातील खाच-खळगे समजावून घेऊन त्यापासून मार्ग काढणारा व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. पण, हे खाच-खळगे समजणार तरी कसे? हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असणार. जो व्यक्ती नेहमी सतर्क आणि परिस्थितीचे चिंतन मनन करतो, तो आयुष्यात सर्व सुखांची प्राप्ती आणि यश संपादन करतो. जो व्यक्ती ठरलेल्या योजनेप्रमाणे काम करतो तो यशाच्या शिखरावर पोहचतो. काही लोकांना खूप कष्ट करूनही आयुष्यात यश प्राप्त होत नाही, यामुळे त्यांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. या काही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खाच खळगे जाणून घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी फार त्रास सहन करावा लागणार नाही.
> सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीला त्याचे उत्पन्न आणि खर्च किती आहे हे माहित असणे आवश्यक आहे. उत्पन्न किती आहे यावरूनच व्यक्तीने खर्च करावा. समजदार व्यक्तीला वर्तमानातील वेळ कशी आहे हे समजते. आता सुखाचे दिवस आहेत की दुःखाचे. याचा आधारावर तो कार्य करतो.
> आपले खरे आणि विश्वासू मित्र कोण आहेत हे आपल्याला माहिती हवे. कारण विविध परिस्थितींमध्ये मित्रांच्या वेशात शत्रूंचाही सामना करावा लागू शकतो.
> प्रत्येक व्यक्तीला माहिती हवे की, तो ज्या ठिकाणी राहतो ती जागा कशी आहे? तेथील वातावरण कसे आहे?
व्यक्तीला तो किती योग्य आहे आणि कोणकोणते काम कुशलतेने पूर्ण करू शकतो हे माहिती असणे आवश्यक आहे. ज्या कामामध्ये आपण निपुण आहोत तेच काम आपल्याला यश मिळवून देते.
> व्यक्तीला त्याचा गुरु किंवा स्वामी कोण आहे? हे माहिती असणे आवश्यक आहे.

या गोष्टी ध्यानात ठेवा आणि त्याची उत्तरं आपापल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करा. कदाचीत प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला उमजून जाईल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.