सकाळी उठल्यावर ही कामे करणे टाळा

प्रत्येक दिवसाची सकाळ ही नवा दिवस घेऊन उजाडते. नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा देते. यामुळे सकाळचे वातावरण प्रसन्न असले की संपूर्ण दिवस चांगला जातो. 

Updated: Jan 16, 2016, 10:48 AM IST
सकाळी उठल्यावर ही कामे करणे टाळा title=

नवी दिल्ली : प्रत्येक दिवसाची सकाळ ही नवा दिवस घेऊन उजाडते. नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा देते. यामुळे सकाळचे वातावरण प्रसन्न असले की संपूर्ण दिवस चांगला जातो. मात्र सकाळी वातावरण बिघडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण दिवसाच्या दिनचर्येवर होतो. यासाठी सकाळची प्रसन्नता टिकून राहण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. 

सकाळी नेहमी चिंतामुक्त आणि प्रसन्न चेहऱ्याने जागे व्हा. त्यामुळे तुमचा दिवस उत्तम जाईल. 

सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहू नका. उठल्यावर आधी दोन्ही हात जोडून देवाचे स्मरण करा. 

सकाळी सकाळीच कोणत्याही गोष्टीवरुन वाद घालू नका. यामुळे दिवसभरात चिडचिडेपणा वाढतो. यामुळे अख्खा दिवस खराब जातो. 

क्रोध आणि तणावापासून कसे दूर राहता येईल याचा प्रयत्न करा.

वडिलधाऱ्या व्यक्तींना अपमानास्पद वाटेल असे काही बोलू नका. 

सकाळी तुमच्या घरी एखादा भिकारी आल्यास त्याला रिक्त हस्ते माघारी धाडू नका.